Special Report : नारायण राणे म्हणतात, उद्धव आणि रश्मी ठाकरे यांना भेटणार, कारणही सांगितलं

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना सुरक्षा सोडून येण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान नारायण राणे यांनी स्वीकारलंय.

Special Report : नारायण राणे म्हणतात, उद्धव आणि रश्मी ठाकरे यांना भेटणार, कारणही सांगितलं
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 10:18 PM

मुंबई : संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर नारायण राणे यांनी २४ तासांच्या आत पटलवार केला. राणे यांनीसुद्धा राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ऐकमेकांची भाषा पाहून घेण्यापर्यंत पोहचली आहे. संजय राऊत तू जिथं म्हणशील तिथं यायला मी तयार आहे. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे, अशी टीका नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. संजय राऊत यांनी तू कोण आहे. तू काय उखडणार आहे. अशी जळजळीत टीका केली. त्यानंतर नारायण राणे यांनीही पटलवार केला.

उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राऊत यांची तक्रार करणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. राऊत संसदेत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलायचे. राऊत यांचे कारनामे सांगितले तर ठाकरे चपलेनं मारतील. असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

माझ्या आयुष्यात मी नारायण राणे यांना कधी भेटलो नाही. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं. आताचं माझं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. मी हसलो, तेही हसले, असंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना सुरक्षा सोडून येण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान नारायण राणे यांनी स्वीकारलंय. राऊत यांना जोकर म्हणतं बोलावलं तिथं जाऊ, असं राणे म्हणाले.

राणे कुटुंब आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच राजकीय वाद आणि वार पलटवार सुरुच असते. पण आत्ताचा वाद एकमेकांना पाहून घेण्याची भाषा करण्यापर्यंत पोहोचलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.