AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर रद्द झालेल्या सिडकोच्या 1700 सोडतधारकांना मोठा दिलासा, मनसेच्या पाठपुराव्याला यश

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेले सिडकोचे सोडतधारक हप्ते भरु शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे या सोडतधारकांना आता त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.

घर रद्द झालेल्या सिडकोच्या 1700 सोडतधारकांना मोठा दिलासा, मनसेच्या पाठपुराव्याला यश
MNS Bomba Maro Agitation
| Updated on: Oct 30, 2020 | 8:29 AM
Share

मुंबई: कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या, तसेच बँकेच्या थांबलेल्या व्यवहारामुळे जवळपास 1700 सोडतधारकांना घराचा नियोजित हप्ता सिडकोला भरता आला नाही. त्यामुळे 29 सप्टेंबरला सिडकोने अशा सोडतधारकांचे घर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्र 1 ऑक्टोबरच्या आसपास सिडकोच्या सोडतधारकांना मिळाले. त्यामुळे हजारो सोडतधारकांचे हक्काच्या घराचे स्वप्न भंगले, असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, मनसेच्या पाठपुराव्यानंतर सिडकोच्या सोडतधारकांना त्यांचे घर आता मिळणार आहे. (Navi Mumbai Great relief to 1700 CIDCO lottery winners due to MNS)

दरम्यान, ज्या सोडतधारकांची पैसे भरण्याची तयारी आहे. त्यांना जवळपास 60 हजार ते 75 हजार मुद्रांक शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, शासननिर्णयानुसार ते 1 हजार रुपये आकरण्यात यायला हवे होते. अशावेळी मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. सोडत रद्द केलेल्या 1700 सोडतधारकांना माणुसकीच्या भावनेतून पुन्हा एक संधी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. मुखर्जी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हप्ते भरण्याची तयारी असणाऱ्यांना पुन्हा संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले.

मुद्रांक शुल्कही 1 हजार रुपये होणार

मनसेच्या पाठपुराव्यानतंर 27 ऑक्टोबर रोजी सोडतधारकाने 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत हप्ते भरण्याची तयारी दाखवल्यास घर मिळण्याची संधी अशा आशयाचे मेसेजही सिडकोकडून या सोडतधारकांना पाठवण्यात आले. इतकेच नाही तर सिडकोचे पणण संचालक लक्ष्मीकांत डावरे यांच्याशी झालेल्या चर्चेत येत्या काही दिवसात मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये करण्याबाबत लेखी पत्र देऊ किंवा परिपत्रक काढू असं आश्वासन मनसेला देण्यात आलं आहे.

सोडतधाकरांकडून आभार

मनसेच्या या पाठपुराव्यामुळे सिडकोच्या सोडतधारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर या सोडतधारकांनी मनसेच्या कार्यालयात जात त्यांचे आणि डॉ. मुखर्जी यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या:

 विमानतळासाठी जमिनी घेऊन झाल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडले; संतप्त प्रकल्पग्रस्तांचा सिडकोला घेराव

CIDCO | सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ, नवी तारीख जाहीर

नवी मुंबईत ‘सिडको’ विकास अधिकाऱ्याला काळे फासले, सहा पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा

Navi Mumbai Great relief to 1700 CIDCO lottery winners due to MNS

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.