नवी मुंबई मेट्रोला चीनचे डबे, प्रकल्प पूर्ण करण्याबाबत ‘सिडको’ला चिंता

नवी मुंबई मेट्रोसाठी लागणारे भविष्यातील डबे कशा प्रकारे पुरवले जातील, हा प्रश्न सिडकोला पडला आहे. (Navi Mumbai Metro attached China Manufactured Bogie)

नवी मुंबई मेट्रोला चीनचे डबे, प्रकल्प पूर्ण करण्याबाबत 'सिडको'ला चिंता
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 12:43 PM

नवी मुंबई : भारत-चीन तणाव वाढल्यानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट चायना’ मोहीम जोर धरु लागली आहे. मात्र नवी मुंबईत धावणाऱ्या मेट्रोला चीनमध्ये उत्पादित करण्यात आलेले 24 डबे लागणार आहेत. त्यामुळे भविष्यातील डब्यांचा कशाप्रकारे पुरवठा होणार, हा प्रश्न आता ‘सिडको’समोर पडला आहे. (Navi Mumbai Metro attached China Manufactured Bogie)

नवी मुंबईत सिडकोकडून चार मार्गावर मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रोसाठी लागणारे पहिल्या टप्प्यातील 24 डबे मागील वर्षीच दाखल झाले आहेत. हे डबे लावून मेट्रोची पहिली यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली होती. मेट्रोच्या पुढील मार्गासाठी चीनी कंपनीकडून डबे घेतले जाणार असून त्याची मागणी नोंदवण्यात आली आहे.

सिडको मेट्रोचा प्रकल्प पूर्ण कसा करणार ?

केंद्र व राज्य सरकारने चीनी प्रकल्पांना स्थगिती देण्याचा अथवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोसाठी लागणारे भविष्यातील डबे कशा प्रकारे पुरवले जातील, हा प्रश्न सिडकोला पडला आहे.

हेही वाचा : सर्वात आव्हानात्मक पल्ला पार! ‘मेट्रो 3’ मार्गावर एकाच टप्प्यात सलग 4 किमी भुयारीकरण पूर्ण

बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील कामे पूर्ण झाली असून आता काही तांत्रिक कामे सुरु आहेत. या मार्गावरील सिग्नल यंत्रणा, कोचेस आणि रुळ टाकण्याची कामे टाटा, अनसोल्डो, आणि एका चीनी कंपन्यांना संयुक्तरीत्या देण्यात आली होती. या तीन कंपन्यांसाठी अ‍ॅनटॅक कंपनीच्या वतीने चीन उत्पादित 24 डबे मागवण्यात आले आहेत. (Navi Mumbai Metro attached China Manufactured Bogie)

नवी मुंबईत मेट्रोचे 4 मार्ग

1) बेलापूर ते पेन्धर 2) खांदेश्वर ते तळोजा 3) पेन्धर ते तळोजा 4) खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ

बेलापूर ते पेन्धर या 11 किलोमीटर मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 2019 सप्टेंबर महिन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या मेट्रो मार्गावरील चाचणी पूर्ण करण्यात आली होती. या पहिल्या मेट्रो मार्गावर चार डब्बे जोडून मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती. सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील बेलापूर ते पेन्धर या 11 किलोमीटर मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

(Navi Mumbai Metro attached China Manufactured Bogie)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.