AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashashri Shinde : यशश्री शिंदेच्या हत्येचे खरं कारण आलं समोर; आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Dawood Shaikh Police Custody : नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या हत्येचे कारणही समोर येत आहे.

Yashashri Shinde : यशश्री शिंदेच्या हत्येचे खरं कारण आलं समोर; आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी दाऊद शेखला कोठडी
| Updated on: Jul 31, 2024 | 11:40 AM
Share

नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पोलीस दाऊदी शेखची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. त्याने यशश्रीला का मारले या प्रश्नासंबंधी आणि इतर तपास पोलीस करत आहेत.

यशश्रीची का केली हत्या

दाऊद शेख याला कर्नाटकच्या गुलबर्गा येथून मंगळवारी अटक करण्यात आली. पहाटे पाच वाजता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. यशश्रीची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. यशश्री आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मैत्री होती. उरणमध्ये दोघेही एकाच परिसात राहायला होते. यशश्रीच्या कुटुंबियांनी त्या्च्याविरोधात तक्रार दिल्यानंतर दाऊद विरोधात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता.

तो तुरुंगातून नुकताच बाहेर आला होता. दाऊद उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी संपर्क साधला. त्यावेळी दोघांनी भेटायचे ठरवले. दोघांमध्ये घटनेच्या दिवशी भेट झाली. त्यावेळी दाऊदने तिला लग्नाची गळ घातली. लग्नाला नकार दिल्यानेच तिची हत्या केल्याचे दाऊद शेखने पोलिसांना सांगितले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला

यशश्री हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. जलदगती न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे प्रकरण हाताळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चेनंतर याविषयीची माहिती दिली होती. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात आरोपी दाऊद पुणे पोलिसांना हवा आहे.

अजून एकाची चौकशी

सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकमधून पोलिसांनी अजून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दाऊद हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दाऊद आणि त्याच्यामध्ये काय संवाद झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.