Navneet Rana : नवनीत राणांची तब्येत खालावली, रुग्णालयातील व्हिडिओत नेमकं काय?

सुरूवातील पोलीस आपल्याला नीट वागणूक देत नसल्याचा आरोपही नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर त्यांची तब्येत ठिक नसल्याच्या बातम्या समोर आल्या. नवनीत राणा आणि रवी राणा आता जामीन मिळाल्यावर बाहेरही आले. मात्र आज नवनीत राणा यांना त्यांची तब्येत खालावल्याने पुन्हा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Navneet Rana : नवनीत राणांची तब्येत खालावली, रुग्णालयातील व्हिडिओत नेमकं काय?
नवनीत राणांची तब्येत खालावली, रुग्णालयातील व्हिडिओत नेमकं काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 3:56 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपसासून राज्यात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि हिंदुत्वावरून राजकीय घमासान सुरू आहे. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी आक्रमक होत मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा जणू विडाच उचलला. त्यानंतर शिवसेनाही (Shivsena) आक्रमक झाली. राणांच्या घरावर जोरदार आंदोलन झालं. हे आरोप प्रत्यारोप आणि दोन्ही बाजुच्या आंदोलनाचं प्रकरण पोलिसांत पोहोचलं आणि नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल झाली. त्यानंतर कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची कोठडी सुनावली. सुरूवातील पोलीस आपल्याला नीट वागणूक देत नसल्याचा आरोपही नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर त्यांची तब्येत ठिक नसल्याच्या बातम्या समोर आल्या. नवनीत राणा आणि रवी राणा आता जामीन मिळाल्यावर बाहेरही आले. मात्र आज नवनीत राणा यांना त्यांची तब्येत खालावल्याने पुन्हा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

व्हिडिओत काय?

त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हेही नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. त्याचवेळी नवनीत राणांना ज्या रुग्णालयात ठेवण्यात आलंय. तिथले काही व्हिडिओही समोर आले. त्यात नवनीत राणा यांची तब्येत चांगलीच खालावल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत नवनीत राणा या डॉक्टरांना आपल्या तब्येतीबाबत आणि मानेबाबत होणारा त्रास सांगताना दिसून येत आहे. डॉक्टरांनी सध्या त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

नवनीत राणा यांचे वकील काय म्हणाले?

नवनीत राणा यांचे वकील दीप मिश्रा यांनीही याबाबत काही माहिती दिली आहे. भायखळा कारागृहात खासदार नवनीत राणा यांना व्यवस्थित उपचार मिळाले नाही. वेळीच उपचार केले असते तर त्यांची तब्येत खराब झाली नसती. 27 तारखेपासून त्यांना मणक्याच्या त्रास होतोय. 8 दिवसानंतर सिटी स्कॅन करण्यात आलं त्यामुळे हा त्रास वाढला आहे. नवनीत राणा यांना इनडोअर पेशंट म्हणून ऍडमिट केलं आहे. अजून किती दिवस ऍडमिट राहतील हे सांगतां येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या वकिलांनी दिली आहे. तर जेल प्रशासनाने दुर्लक्षित केलं असल्याचा राणा यांनी आरोप केला आहे. तसेच आमदार रवी राणा हेही रुग्णालयात पोहोचणार असल्याची माहित देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना जेलमध्ये मिळालेल्या कथित वागणुकीच्या तक्रारी तर दिल्लीपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता त्यांच्या या आरोपांवरही राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.