Navneet Rana : नवनीत राणा, रवी राणांना आज कोर्टात हजर रहावं लागणार, देशद्रोह, हनुमान चालीसा प्रकरणात सुनावणी
काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाल्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे जेलबाहेर आहे. मात्र त्यांच्या मागचा चौकशीचा फेरा अजूनही संपलेला नाही.
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवसस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa)पठणाचा हट्ट राणा दाम्पतल्याला चांगलाच महागात पडल्याचेही दिसून आले. कारण याच प्रकरणात काही दिवासांपूर्वी खासदार नवनीत राणा, रवी राणा आणि शिवसेना हे आमनेसामने आल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राणा यांच्या घरावर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. तसेच काही वक्तव्यांप्रकरणा राणा यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हा दाखल झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटकही गेली. हे अटक प्रकरणही दिल्लीपर्यंत गाजलं. मात्र काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाल्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे जेलबाहेर आहे. मात्र त्यांच्या मागचा चौकशीचा फेरा अजूनही संपलेला नाही. त्यांना आज (15 जून) मुंबईतल सेशन कोर्टात हजर राहवं लागणार आहे. कारण याच प्रकरणात आज त्यांची सुनावणी होणार आहे.
आज कोर्टात काय होणार?
खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाल्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवस जेलमध्ये काढावे लागले होते. जेलमध्ये खासदार नवनीत राणा यांना योग्य वागणूक न मिळाल्याचा तसेच त्यामुळेच त्यांचे आजारपण बळावण्याचा आरोपही करण्यात आला. तशी तक्रारही त्यांनी लोकसाभा अध्यक्षांकडे केली. त्यात संसदीय समितीपुढेही या प्रकरणी सुनावणी झाली.
काही दिवासांपूर्वी मुंबईतल्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश हे संसदीय समितीकडून देण्यात आले होते. या प्रकरणातही आणकी काही नवी ट्विट येण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी कोर्टाने जामीन मंजूर करत राणा यांना तूर्तास दिलासा दिलासा दिला असला तरी आत्ता कोर्टातील सुनावणीत काय होतंय याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांनी चुकीचे गुन्हा दाखल केल्याचे आरोप
पोलिसांनी राजकारणाला बळी पडून तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी सांगितल्या प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. हा आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप वारंवार राणा यांच्याकडून करण्यात आलाय. तसेच हे प्रकरण सुरू झाल्यापासून रवी राणा हेही वारंवार हनुमान चालीसा सोबत घेऊन फिरत आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे मतदान पार पडले यावेळी रवी राणा हे हनुमान चालीसा घेऊन महाविकास आघाडीला डिवचताना दिसून आले. तर राणा यांच्या मतावर महाविकास आघाडीनेही आक्षेप घेतल्याचे दिसून आले. राज्याच्या राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद शांत झालेला नाही.