Navneet Rana : मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण देशद्रोह नाही, नवनीत राणांच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद, आज बेल की जेलच?
राणा दाम्पत्य हे निवडून आलेले नेते असून ते कुठेही पळून जाणार नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. दोघांना 8 वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना जामीन हा मजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकीलाने केली.
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान आज कोर्टात (Court) वकिलांमध्ये घमासान युक्तीवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा दाम्पत्याच्या वतीने ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी जबाब नोंदवताना राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती आहे. राणा यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले की, राणा दाम्पत्य हे निवडून आलेले नेते असून ते कुठेही पळून जाणार नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. दोघांना 8 वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना जामीन हा मजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकीलाने केली.
शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले
याशिवाय इतर विषयांवरही युक्तिवाद वकिलातर्फे करण्यात आले. राणा दाम्पत्य मातोश्रीवर एकटेच गेल्याचे सांगण्यात आले. त्याच्यासोबत एकही कार्यकर्ता नव्हता. हिंसाचार करण्याचा कोणताही हेतू नव्हता. असे असतानाही सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आल्याचाा आरोप झाला मात्र खरं तर सरकार समर्थकांकडून आंदोलने केली जात होती. त्यामुळे देशद्रोह नाही. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका वारंवर होत आहे. अशातच राणा दाम्पत्याने हा मुद्दा भाजप आणि राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उचलल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे.
आजही कोठडी मुक्काम वाढणार की बेल?
नवनीत राणांनी आणि आमदार रवी राणा यांनी लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या घर ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राणे दाम्पत्याच्या घराबाहेर त्यांनी दिवसभर गोंधळ घातला. शिवसैनिकांनी राणे दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आणि त्यांना आयपीसीच्या कलम 153A (धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर दोन गटांमध्ये वैर वाढवणे) अंतर्गत तुरुंगात पाठवले, गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य हे कोठडीत आहे. त्यांनी जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आज तरी त्यांना जामीन मिळतो की कोठडीत राहवे लागणार हेही पाहणं महत्वाचं आहे.