Breaking | मुंबईत नेव्हीच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात, मोठी दुर्घटना…
अपघातामागील कारणांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असं वक्तव्य नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
मुंबई : मुंबईत भारतीय नौदलाच्या (Navy) ध्रुव हेलिकॉप्टरचा (Helicopter) अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात क्रू सदस्यांपैकी सर्वांनाच वाचवण्यात यश आलंय. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती नौदलाने दिली आहे. नौसेनेच्या एका गस्तीवरील जहाजाने हेलिकॉप्टरमधील क्रू मेंबर्सना वाचवलं. हा अपघात नेमका कसा झाला, यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. अपघातामागील कारणांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असं वक्तव्य नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
Indian Navy ALH, on a routine sortie off Mumbai, met with an accident close to the coast. Immediate search and rescue ensured the safe recovery of a crew of three by Naval patrol craft. An inquiry to investigate the incident has been ordered: Indian Navy pic.twitter.com/MhgFgDka14
— ANI (@ANI) March 8, 2023
समुद्र किनारी सुरक्षित लँडिंग
या अपघाताविषयी हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील नौदलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर नेहमीपर्माणे उ्डडाण करत होतं. उड्ढाण घेताना हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळलं. हे नेव्हीतील अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर अर्थात ALH हेलिकॉप्टर होते. हेलिकॉप्टरचा अपघात होताच ही माहिती नौसेनेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. समुद्र किनाऱ्यावरील गस्तीवरील बोटीद्वारे अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
अपघात का घडला?
मुंबई किनाऱ्यावर नौदलाच्या या हेलिकॉप्टर अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र दुर्घटनेची तत्काळ चौकशी करून अपघाताचं कारण स्पष्ट केलं जाईल, अशी माहिती नौदलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.