VIDEO: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, गृहमंत्र्यांकडे मागणी करणार: नवाब मलिक

साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. (nawab malik)

VIDEO: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, गृहमंत्र्यांकडे मागणी करणार: नवाब मलिक
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 1:13 PM

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. (nawab malik demand fast track court be set up in sakinaka rape incident)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या महिलेसोबत दुष्कर्म करण्यात आला होता. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पण आरोपीला अटक केल्यानंतर निश्चित रुपाने सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू, तसा आग्रह गृहमंत्र्यांना धरू. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या शिक्षेने आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं मलिक यांनी सांगितलं.

घटना घडल्यावरच चर्चा करणार आहोत का?

ही घटना अत्यंत संतापजनक आहे. तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे. निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का? घटना घडल्यानंतर आपण चार दिवस चर्चा करतो आणि नंतर गप्प बसतो. समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसावी, कायद्याचे राज्य असले तरी माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्त्र श्वापादांचा नायनाट व्हावा यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने एकत्र यावे. कालची घटना अमानवी आहे. आरोपींना शिक्षा होईल. पण तरीही या घटना थांबणार आहेत का? वाढती विकृती आपण थांबवणार आहोत की नाही?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला. वाढती पोर्नोग्राफी थांबवण्यासाठी आमच्या खासदाराने केंद्र सरकारला पत्रं लिहिलं असून त्यावर कार्यवाही होण्याची अपेक्षाही चाकणकर यांनी व्यक्त केली.

भीम आर्मीचं आंदोलन

दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली. राजावाडी रुग्णालय परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तीन दिवस मृत्यूशी झुंज

मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (nawab malik demand fast track court be set up in sakinaka rape incident)

संबंधित बातम्या:

Mumbai Sakinaka case : मृत्यूपूर्वी पीडितेची रुग्णालयात चौकशी, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

(nawab malik demand fast track court be set up in sakinaka rape incident)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.