AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद की संभाजीनगर? : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर

औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे (Nawab Malik on Aurangabad rename).

औरंगाबाद की संभाजीनगर? : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
nawab malik
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 5:42 PM

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीचं (Aurangabad Municipal Election 2021) बिगूल वाजण्याआधीच शहरातील राजकारण प्रचंड तापायला लागलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र, या नामकरणाला सत्ताधारी पक्षातील काँग्रेसचा विरोध आहे. औरंगाबाद शहरातील शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांनी नामकरणावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा नामकरणाला विरोध आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामकरणावर मंत्रिमंडळातील नेत्यांचं एकमत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नामकरणाबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे (Nawab Malik on Aurangabad rename).

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत भाष्य केलं. “औरंगाबाद शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (Nawab Malik on Aurangabad rename).

नामकरणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराच्या नामकरणावर प्रतिक्रिया दिली होती. “नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील”, असं थोरात म्हणाले होते.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

“औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मी इकडे आलोय. शेतकऱ्यांना आम्ही मोठी मदत केली, चक्रीवादळात आणि अतिवृष्टीत आम्ही मोठी मदत केली. आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत. पण, भाजपला रोखण्यासाठी काही तडजोड करावी लागली तर विचार केला जाईल”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं.

ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : नवाब मलिक

दरम्यान, नवाब मलिक यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस देण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मांडली आहे.

“वर्षा राऊत किंवा इतर राजकीय व्यक्ती असतील त्यांना समन्स आले असतील तर चौकशीलसा सामोरं जावं लागेल. समोर जाणं म्हणजे काही चूक केली असं होत नाही. ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील”, असं मलिक म्हणाले.

“ईडीचा वापर केंद्र सरकार करते हे आता लपून राहिलेलं नाही. ही पद्धत योग्य नाही. केंद्र सरकार अशा यंत्रणांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही”, असं नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातमी :

नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.