मुंबई: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आजी-माजी आमदारांसह विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलेल्या सर्व 114 उमेदवारांसोबत चर्चा केली. यावेळी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी मिशन 114च्या कामाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (nawab malik reaction on ncp meeting in mumbai)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधला. 2019च्या निवडणुकीत 114 उमेदवारांना तिकीट दिलं होतं. त्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार, मंत्रीही उपस्थित होते. यावेळी एकूण 55 लोकांनी आपली मते मांडली. मतदारसंघातील परिस्थिती, तिथले प्रश्न आदी मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. या बैठकीत ज्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्याची नोंद मंत्र्यांनी घेतली आहे. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे, असं मलिक म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
गणपती विसर्जन झाल्यावर जनता दरबार पुम्हा सुरू होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. तेव्हा भाजप विरोधात होता. त्याचं काम आमच्या काळातलं आहे. भाजपनं उगाच याचं श्रेय घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडत आहे.@PawarSpeaks #NCP #meeting pic.twitter.com/RGltqwAaOk
— NCP (@NCPspeaks) September 8, 2021
दरम्यान, तीन वर्षानंतर विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 114 जागा आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीने या 114 मतदारसंघावरच अधिक फोकस करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. या 114 मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पवारांनी आज जाणून घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने मिशन 114 हाती घेतल्याचं बोललं जात आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आजची बैठक सुद्धा मतदारसंघातील मोर्चेबांधणीचा भाग असल्याचंच राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. (nawab malik reaction on ncp meeting in mumbai)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 September 2021https://t.co/XVgPM59JzW#100Superfastnews #superfastnews #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2021
संबंधित बातम्या:
‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात
(nawab malik reaction on ncp meeting in mumbai)