मुंबईकरांचा संताप; या रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन
Mumbai News : कोलकत्ता येथील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुंबईत पण एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणात एका सहाय्यक प्राध्यापकास निलंबित करण्यात आले आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता मुंबईतही विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अख्यारित असलेल्या बीआयएल नायर धर्मादाय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याने एकच संताप व्यक्त होत आहे. प्रकरणात सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपी-निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या डॉक्टरची बदली होणार होती, त्यापूर्वीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सहा महिन्यांपूर्वी मार्चमध्ये या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला एका सहाय्यक प्राध्यापकाने बोलावले आणि तिच्या खेळाविषयी विचारणा केली. त्यानंतर तिला पुन्हा एकदा त्याने बोलावले. विद्यार्थिनी केबिनमध्ये आल्यावर त्याने तिच्या मानेला आणि कानाला अयोग्यरित्या स्पर्श केला. नाकातील लिफ्म नोड्सची सूज तपासण्याच्या बहाण्याने त्याने हे कृत्य केल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. तिला या प्राध्यापकाने ॲप्रन काढायला सांगितला. तर तिच्या ओठाच्या रंगावरूनही कमेंट केली. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थिनीने लागलीच याविषयीची तक्रार केली.
बदलीपूर्वीच निलंबन
प्राथमिक तथ्य आणि घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत या सहाय्यक प्राध्यापकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या डॉक्टरची नायर रुग्णालयातून केईएम रुग्णालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यापूर्वीच या प्रकरणात त्याच्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणात सर्व चौकशी झाल्यानंतर समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याने एकच संताप व्यक्त होत आहे. याप्रकारामुळे विद्यार्थिनी भयभीत झाल्या आहेत. असे प्रकार घडू नये यासाठी कडक नियम करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर असे प्रकार झाल्यास त्वरीत तक्रार करण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणात सर्व चौकशी झाल्यानंतर समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.