Shah Rukh Khan : NCB ने फास आणखी आवळला, आता आर्यन खानच्या ड्रायव्हरलाही समन्स धाडलं!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता NCB ने आर्यन खानच्या ड्रायव्हरलाही समन्स पाठवण्यात आलं आहे.

Shah Rukh Khan : NCB ने फास आणखी आवळला, आता आर्यन खानच्या ड्रायव्हरलाही समन्स धाडलं!
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:16 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता NCB ने आर्यन खानच्या ड्रायव्हरलाही समन्स पाठवण्यात आलं आहे. आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. हा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात असल्याची माहिती आहे.

आर्यन खानचा ड्रायव्हर एनसीबी कार्यलयात उपस्थित आहे. क्रूझ पार्टीला जाण्यासाठी याच ड्रायव्हरने त्याला सोडलं होतं, अशी माहिती मिळत आहे. याच संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट हे दोघे पार्टीला एकत्र गेले होते. अरबाजजवळ चरस नावाचे ड्रग्ज सापडले होते. या सगळ्या कड्या जुळवून पाहण्यासाठी तसेच काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी ड्रायव्हर सध्या एनसबीच्या ऑफिसमध्ये आहे. त्याला समन्स बजावण्यात आलं आहे. त्याची सध्या चौकशी सुरु आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही. पण अरबाजकडे सहा ग्रॅम ड्रग्ज सापडलं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पडताळण्यासाठी त्याला समन्स बजावण्यात आले आहे.

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, काल किल्ला कोर्टानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानला अजून किमान दोन रात्री तरी तुरुंगातच काढाव्या लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तीवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. पण किल्ला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

क्रूझवरील छापेमारीत काय सापडलं?

मुंबईच्या समुद्रात 2 ऑक्टोबर रोजी एका लग्झरी क्रुझवर एनसीबीने छापेमारी केली होती. त्या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती आता समोर येतेय. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारलं की तुझ्याकडे ड्रग्स आहे का? तेव्हा त्याने सांगितलं की त्याने आपल्या बुटात ड्रग्स लपवलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर अरबाजने आपल्या बुटातून एक ZIP LOCK पाऊच काढलं, त्यात चरस होतं.

आर्यन खानसह दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. काल आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.

संबंधित बातम्या  

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

Imtiaz Kharti : बॉलिवूडमधील सर्वात बडा मासा गळाला, NCB ची इम्तियाज खत्रीवर धाड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.