AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अजित पवार यांची मोठी खेळी, शरद पवार यांच्यापुढे नवं आव्हान

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या 2 दिवसांआधीच अजित पवारांनी मोठी खेळी केली. पक्ष आणि चिन्हावर दावा करतानाच, अजित पवारांचीच अध्यक्षपदी निवड झाल्याचं आयोगाला सांगण्यात आलंय. तर शरद पवारांच्याच अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अजित पवार यांची मोठी खेळी, शरद पवार यांच्यापुढे नवं आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 11:10 PM

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी केली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 2 जुलैला घेतली. मात्र 2 दिवसांआधीच म्हणजे 30 जूनला अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केला. तशी याचिकाच अजित पवार गटाकडून निवडूक आयोगात करण्यात आली. त्यामुळे आता पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात सुरु झालीय.

अजित पवारांनी 30 जूनलाच राष्ट्रवादीच्या चिन्हावर दावा केला. राष्ट्रवादीचे आमदार, खासदार असे एकूण 40 जणांची प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली. अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा ठराव आमदार, खासदारांनी पास केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 3 जुलैला जयंत पाटलांनीही निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल केली. कॅव्हिएटचा अर्थ असाच आहे की, निर्णय घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल.

अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या अपात्रतेबद्दल जे पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आलं, त्याची प्रतही आयोगाला देण्यात आलीय. मात्र पक्षाचं चिन्ह जाऊ देणार नाही आणि चिन्हं गेलं तरी चिंता नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीलाही आव्हान देण्यात आलं आहे. प्रेस नोट काढून अजित पवार गटानं राष्ट्रवादीत बेकायदेशीर निवड झाल्याचं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

अजित पवार गटानं नेमकं काय म्हटलंय?

  • घटना आणि नियमांचं उल्लंघन करुन पक्षाचा कारभार सुरु असल्यानं असंतोषाची भावना निर्माण झाली
  • 30 जून 2023 रोजी अजित पवारांची अध्यक्षपदी निवड बहुसंख्य सदस्यांच्या सहीनं ठरावाद्वारे करण्यात आली
  • 10 आणि 11 सप्टेंबर 2022ला शरद पवारांची झालेली निवड बेकायदेशीर आहे
  • शरद पवारांच्या बाजूनं मतदान केलेल्या व्यक्तींची कोणतीही नोंद नाही
  • प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांपैकी एक होते आणि आताही आहेत
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संपूर्ण रचनाच घटनेतील तरतुदींनुसार नाही
  • अध्यक्षपदासह कोणत्याही पदासाठी निवडणूक प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही
  • विविध समित्यांवर नियुक्त झालेले पदाधिकारी कायदेशीरपणे पद भूषवत नाही
  • जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांची हकालपट्टी केली
  • निवडणूक आयोगानं पक्षासंदर्भात निर्णय दिल्यावरच कोण बेकायदेशीर हेही ठरेल

पवार काका-पुतण्यांमध्ये संघर्ष

24 तासांच्याआधी पर्यंत अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं म्हणत होते. मात्र 30 तारखेलाच अजित पवारांचीच अध्यक्ष म्हणून निवड झालेली प्रतिज्ञापत्र आयोगाला देण्यात आलीय. विशेष म्हणजे अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत खासदार सुनिल तटकरेंनीही अजित पवारांचा उल्लेख राष्ट्रीय नेते असा केला.

शपथविधी आधीच, अजित पवारांनी आमदार खासदारांचं समर्थनच मिळवलं नाही. तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतली. म्हणजेच, अभ्यासपूर्ण खेळी अजित पवार गटानं केली, ज्याचा उल्लेख अजित पवार कॅम्पच्या छगन भुजबळांनी केलाय.

अजित पवार आणि शरद पवार, दोन्ही काका पुतण्यांकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली. अजित पवारांच्या बैठकीत 32 आमदार तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार हजर राहिले. राष्ट्रवादीचे एकूण आमदार 53 आहेत. मात्र 5 आमदार दोन्ही बैठकीला हजर राहिले नाहीत. पण भुजबळांनी अजित पवार गटाकडे 40 आमदार असल्याचा दावा केलाय.

एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेना फुटली. तो संघर्ष उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुरु आहे. तशीच पक्ष आणि चिन्हाची लढाई, पवार काका-पुतण्यांमध्ये सुरु झालीय.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.