Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसोबत उभं राहण्यावर ठाम, सायंकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार; अजित पवारांची पुन्हा घोषणा

कोरोनाच्या काळात जे कार्यक्रम घेतले गेले, ते त्यांच्या नेतृत्वात झाले. राज्यात जी काही कामे आहेत, ती त्यांच्या नेतृत्वात करून राज्याला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आताच्या परिस्थितीतही राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसोबत उभं राहण्यावर ठाम, सायंकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार; अजित पवारांची पुन्हा घोषणा
राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर बोलताना अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 4:26 PM

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्यावर ठाम आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत बोलत होते. आज संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हेदेखील असणार आहेत. दरम्यान विधीमंडळचे काही निर्णय असतील तर विधीमंडळाचे उपसभापती घेणार, अशी माहिती त्यांनी दिली. बंडखोरी हा शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत प्रश्न आहे. ते आमदार माझ्या पक्षातील नाहीत, त्यामुळे त्यांना सल्ला किंवा त्यावर त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम’

मागील अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत. सर्वांना सोबत घेऊन ते काम करीत आहेत. वेगवेगळ्या राज्यांची मुख्यमंत्र्यांची यादी जेव्हा जायची तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा तिसरा, चौथा, पाचवा असा क्रमांक यायचा. ते क्रमांक आम्ही देत नव्हतो. कोरोनाच्या काळात जे कार्यक्रम घेतले गेले, ते त्यांच्या नेतृत्वात झाले. राज्यात जी काही कामे आहेत, ती त्यांच्या नेतृत्वात करून राज्याला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले, याविषयी ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे आताच्या परिस्थितीतही राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मुख्यमंत्र्यांचे अजिबात दुर्लक्ष नाही’

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांभाळण्याच्या नादात शिवसेनेच्या आमदारांकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष झाले का, असे विचारले असता अजिबात नाही, असे उत्तर त्यांनी दिले. सुरुवातीचे काही दिवस मुख्यमंत्र्यांनी वर्षावरून काम पाहिले. त्यावेळी कामामध्ये कुठलाही अडथळा आला नाही. आताही ते तेथून कारभार करत असतील तर काहीच अडचण नाही. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल माझ्याकडे काहीही माहिती नाही आणि ऐकीव बातम्यांवरून मी मत व्यक्त करत नाही, असे अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.