BIG BREAKING | शरद पवार संतापले, दोन दिग्गज नेत्यांविरोधात केली सर्वात मोठी कारवाई

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. त्यांनी अजित पवार यांना साथ देणारे पक्षाचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

BIG BREAKING | शरद पवार संतापले, दोन दिग्गज नेत्यांविरोधात केली सर्वात मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 5:21 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार यांनी या दोन्ही बड्या नेत्यांना थेट पक्षातून बडतर्फ केलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शरद पवार यांनी ही मोठी कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना बडतर्फ केले आहे. यामध्ये शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, विजय देशमुख यांचा समावेश आहे. जयंत पाटील यांनी याबाबतचं पत्र संबंधित नेत्यांना पाठवलं आहे. जयंत पाटील यांची याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे.

जयंत पाटील यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

“महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, विजय देशमुख हे नेते उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून आणि पक्षाच्या विविध पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे”, असं जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अनेक आमदार सध्या तरी अजित पवार यांच्या बाजूने आहेत. तर काही आमदार आपल्याला फोन करुन तुमच्यासोबत आहोत, असं सांगत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडींचा सामना करण्यासाठी शरद पवार सक्षमपणे सामोरं जाण्यास तयार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.