आताची मोठी बातमी | घड्याळ जाताच शरद पवार यांना मिळालं ऐतिहासिक चिन्ह, नव्या पक्षाला उभारी मिळणार?

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेलं आहे. आगामी निवडणूकीत आता शरद पवारांच्या गटाचं नवीन नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं असणार आहे. तर अशातच निवडणूक आयोगाने ऐतिहासिक चिन्ह ही पवार गटाला दिलं आहे.

आताची मोठी बातमी | घड्याळ जाताच शरद पवार यांना मिळालं ऐतिहासिक चिन्ह, नव्या पक्षाला उभारी मिळणार?
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 11:33 PM

मुंबई : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे.  सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. शरद पवार गटाकडून कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते. यामधील शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. आता आगामी निवडणूकीत शरद पवार यांच्या पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर तुतारी हे नवीन चिन्ह असणार आहे. आगामी निवडणूकांमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात ‘तुतारी’ कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली पोस्ट:-

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे.”

दरम्यान, शरद पवार यांच्या आधीच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे देशासह खेडापाड्यात पोहोचलेलं होतं. आता   शरद पवार यांच्या सर्व नेत्यांकडे नवीन पक्ष आणि चिन्ह प्रत्येत मतदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.