BREAKING | दोन तासात मोठ्या भेटीगाठी, अखेर शरद पवार माध्यमांशी बोलणार

महाराष्ट्राच्या राजकारणात आज संध्याकाळच्या सुमारास दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दोन दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. या भेटीमागे नेमकं कारण काय ते समजू शकलेलं नाही. या भेटीगाठींवर शरद पवार स्वत: प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

BREAKING | दोन तासात मोठ्या भेटीगाठी, अखेर शरद पवार माध्यमांशी बोलणार
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 9:21 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज संध्याकाळच्या सुमारास दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार हे वर्षा बंगल्याबाहेर दाखल झाले. पण यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य मानलं नाही. ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देताच तिथून निघून गेले.

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उद्योगपती गौतम अदानी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे या दोन भेटींचं काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. अखेर या दोन तासातील मोठ्या भेटींवर शरद पवार भूमिका मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी यांनी पवारांची आधीही घेतलीय भेट

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. गौतम अदानी यांनी याआधीदेखील अनेकवेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. ज्यावेळेला संसदेत गौतम अदानी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. अदानी यांच्या जीपीएस चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या जीपीएस चौकशीला विरोध केलेला. पण काँग्रेसने जीपीएस चौकशीची मागणी लावून धरलेली. त्यामुळे मोठ वाद निर्माण झालेला. अखेर काँग्रेस आणि इतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शरद पवार त्यांच्या वक्तव्यापासून बॅकफूटवर आलेले बघायला मिळाले होते.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची नेमकी भेट का घेतली? एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. “शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. या संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार आले होते”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“ही सदिच्छा भेट होती. या बैठकीत काही चर्चा झाली नाही. या भेटीत निमंत्रण होतं. याशिवाय काही एक-दोन छोटे विषय होते. यामध्ये शाळांचा विषय होता, कलावंतांचा विषय होता. मुख्य म्हणजे त्यांचं निमंत्रण होतं. अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. बाकी काही नाही”, असं शरद पवार ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.