Sharad Pawar: शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?
ही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींसाठी निराशादायक गोष्ट मानली जात आहे | Sharad Pawar surgery
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 31 मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचे आगामी सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. (Sharad Pawar hospitalized in Mumbai due to problem in his Gall Bladder Endoscopy and Surgery will be conducted on 31st march )
ही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींसाठी निराशादायक गोष्ट मानली जात आहे . शरद पवार 1 एप्रिलपासून तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार होते. पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी प्रचार करु नये, अशी विनंती काँग्रेसने केली होती. मात्र, ही विनंती फेटाळत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी जायचे ठरवले होते.
He (Sharad Pawar) is on blood-thinning medication which is now being stopped due to this issue. He will be admitted to hospital on March 31 & an endoscopy & surgery will be conducted. All his programmes stand cancelled until further notice: NCP leader Nawab Malik
— ANI (@ANI) March 29, 2021
ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होण्याची शक्यता होती. मात्र, आता ऐन लढाईच्यावेळी तृणमूल काँग्रेसला शरद पवारांची रसद मिळणार नसल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या:
पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
शरद पवारांनी काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला जाणार?
(Sharad Pawar hospitalized in Mumbai due to problem in his Gall Bladder Endoscopy and Surgery will be conducted on 31st march )