Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं दाटलेल्या आवाजातलं भाषण …
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यकार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यकार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलायला उभे राहिले. पण शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भारावून गेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजितदादा अत्यंत भावूक झाले. त्यावेळी त्यांनी मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही, अशी भावना व्यक्त करून आपलं भाषण थांबवलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हेलावून गेले होते.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीने व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलं आहे. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी संवाद साधला.
पवार साहेबांबद्दल अनेकजण विचार करतात. त्यांच्या पद्धतीने ते विचार करतात. राज्यातील प्रत्येक घटकांवर साहेबांच्या विचाराचा ठसा आहे. त्यांची नोंद घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही. हे पवार साहेबांचं मोठेपण आहे. पवार साहेब हे साहित्यिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक विश्वात आख्यायिका बनून राहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा आहे. अहोरात्र कष्ट करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सर्वांकडे बारकाईने लक्ष देणं, सर्वांना संस्कार देणं, सामाजिक बांधिलकी देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी केवळ आम्हालाच नाही तर लाखो तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ दिलं. प्रेरणा दिली. तुमच्या माझ्या सारखे लाखो तरुण साहेबांकडे आधारवड म्हणून बघतात, असं सांगतानाच अजितदादांचा कंठ दाटून आला होता.
साहेब म्हणजे समृद्ध विद्यापीठ
साहेब म्हणजे व्यक्ती नाही तर ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असं जागतिक विद्यापीठ आहे. ही माझी नाही तर माझ्यासह देशातील प्रत्येक माणसाची दृढश्रद्धा आहे. राज्यातील सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री असे विक्रम त्यांच्या नावावर आहे. सामाजिक जीवनाची 60 वर्ष त्यांनी पूर्ण केली. आज 81व्या वर्षीही ते सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
पवारांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत न्या
पवारांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रातील जाणत्या राजाचा हा वाढदिवस. शेतकऱ्यांच्या पाठिराख्याचा हा वाढदिवस. वंचित घटकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा वाढदिवस. आदिवसींसाठी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा हा वाढदिवस. महिला, अल्पसंख्याकासाठी निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचा हा वाढदिवस. गेली 60 हून अधिक वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या कर्मयोग्याचा हा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबप्रमुखाचा हा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं. प्रत्येक घटकांपर्यंत पवारांचे विचार पोहोचवा. तरुणांपर्यंत त्यांचा विचार न्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
सरपंच तरी तुमच्या विचाराचा असावा
मी सर्वांचीच भाषण ऐकत होते. त्यांनी सांगितलं. दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी प्रत्येक गावाला तुम्ही जायचं आहे. जे जे पहिल्या शनिवारी आपल्या गावात जाणार आहात तर तुमच्या गावातील सरपंच तरी तुमच्या विचाराचा तरी असावा. नाही तर बरेच पुढारी, देशाचं आणि राज्याचं राजकारण करतात. पण गावाचा सरपंच त्यांचं ऐकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
तर गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं: छगन भुजबळ
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
Sharad Pawar Birthday : ‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’