आमच्यामुळे पराभव? छे छे… यूपीत अजितदादा आहेत का?; छगन भुजबळ यांनी भाजपला डिवचले
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची फक्त एक जागा निवडून आलेली. महायुतीच्या पराभवाचं खापर काही प्रमाणात अजित पवार गटाला आलेल्या अपयशामुळे जास्त फोडलं जातंय. मात्र यावर बोलताना टीव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी भाजपला डिवचलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला म्हणावं असं काही यश मिळालं नाही. महायुतीने महाराष्ट्रातील जागांवर आपला झेंडा रोवला. महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट तिघे सत्तेत असुनही महाविकास आघाडीविरूद्ध त्यांना यश मिळवता आलं नाही. राज्यातील महायुतीचे शिल्पकार भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी आपल्याकडे घेतली. तसं पाहायला गेलं तर अजित पवारांची या निवडणुकीमध्ये एकज जागा जिंकता आली. त्यामुळे राजकीय वर्तुळातही अजित पवारांना सोबत घेतलं पण त्याचा काही फायदा झाला नाही अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्ही९ मराठीच्या मुलाखीतमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवार काय यूपीत आहेत का, असा उत्तर देत भाजपला डिवचलं.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
अजितदादांना घेरण्याचा प्रयत्न आहे की नाही माहीत नाही. आम्हाला सीट किती मिळाल्या दोन सीट. तिसरी शिरुरची सीट शिंदेंक़डून आयात केली. लातूरची भाजपकडून आयात झाली. परभणीची जानकरांना दिली. इन मिन दोन जागांवर लढलो. आम्ही काय ४८ जागांवर लढलो का. आमचा काय परिणाम होणार अजितदादा गटाचा. आज थोडा सेट बॅक बसला. महायुतीच्या माध्यामातून भाजपलाही. महाराष्ट्रातच बसला का. यूपीतही बसला. यूपीत अजितदादा आहे का. नाही. त्यामुळे इतर राज्यातही फटके बसला. जिथे १०० टक्के विजय होता. तिथे पिछेहाट झाली. त्याची काही कारण असतील.तज्ज्ञ लोकं विचार करतील. देशातच परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजितदादांमुळे भाजप मागे गेली हे बोलणं योग्य नाहीआणि पटण्यासारखं नसल्याचं भुजबळ म्हणाले.
यशाचे बाप सर्व असतात. पराभवाला कोणी जबाबदार नसतो. कुणाला एकाला टार्गेट करतात. दादा टार्गेट होणार नाही. दादा प्रामाणिक आहे. ते प्रामाणिकपणे काम करतात. मला सांगा जिथे भाजपचे आमदार आहे. त्याचा अभ्यास केला. तिथेही भाजपला लीड मिळाली नाही. तिथे लीड मिळाली असती तर भाजपची पिछेहाट झाली नसती. भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात पिछेहाट झाली आहे. एकाच पक्षाला चिकटवणं आणि तेवढाच अभ्यास पुढे करणं योग्य नाही, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.