एकनाथ शिंदे यांना डिवचण्यासाठी जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आदेश, नेमकी रणनीती काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना मंत्र्यांना डिवचण्यासाठी एक वेगळी रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांना डिवचण्यासाठी जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आदेश, नेमकी रणनीती काय?
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 8:48 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात 20 जुलै 2022 या तारखेला मोठा भूकंप घडून आला होता. कारण राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात उभी फूट पाडली होती. त्यांनी पक्षाच्या तब्बल 40 आमदारांना घेऊन बंड पुकारलं होतं. सरकारमधील जवळपास 50 आमदार त्यांच्यासोबत होते. हे सर्व आमदार आधी सुरत त्यानंतर तिथून गुवाहाटीला गेले होते. जवळपास महिनाभर हे सत्तानाट्य रंगलं होतं. या दरम्यान राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवं सरकार अस्तित्वात आणलं. या सगळ्या नाट्याला 20 जुलैपासून सुरुवात झाली होती. त्यामुळे येत्या 20 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपला डिवचण्यासाठी निषेध आंदोलन केलं जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या 20 जूनला या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे”, अशी माहिती ट्विटरवर देण्यात आलीय.

हे सुद्धा वाचा

‘ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या’

“खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या. खोके सरकारचा निषेध व्यक्त करा”, असा आदेश जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचं संबंधित पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

‘सरकारच्या हे क्षणिक सुखाला उतरती कळा’

“शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करा. शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा, असे प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे”, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलीय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.