AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करायला हवी होती: नवाब मलिक

संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. (ncp leader nawab malik reaction on chaos in rajya sabha)

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करायला हवी होती: नवाब मलिक
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 2:15 PM

मुंबई: संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. (ncp leader nawab malik reaction on chaos in rajya sabha)

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला. ही घटना अशोभनीय आहे, असं मलिक म्हणाले. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

केंद्राला उत्तरच द्यायचे नव्हते

संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगासस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असा दावाही त्यांनी केला.

पवारांची नाराजी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नाही. राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की झाली. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. बाहेरच्या 40 हून अधिक पुरुष आणि महिलांना सभागृहात आणलं गेलं. हे वेदनादायी आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं पवार म्हणाले.

काल काय घडलं?

संसदेत 127वं घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. मात्र, विमा विधेयकावर दुसऱ्या दिवशी ठरलेलं असतानाही केंद्र सरकारने हे विधेयक चर्चेला मांडलं. त्यामुळे विरोधक संतापले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंसह इतर नेत्यांनी त्याला विरोध केला आणि या घटनेचा जोरदार निषेध केला. शिवसेनेसह इतर पक्षाचे नेते वेलमध्ये उतरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यातच महिला कमांडोजना सभागृहात पाचारण करण्यात आल्याने विरोधक आणखीनच संतापले. त्यात महिला कमांडोजकडून महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याने विरोधकांचा पारा चढला. परिणामी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाल्याने सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. (ncp leader nawab malik reaction on chaos in rajya sabha)

संबंधित बातम्या:

शरद पवार म्हणाले, माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही असं पाहिलं नव्हतं, नेमकं काय घडलंय?

खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?; संजय राऊत भडकले

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

(ncp leader nawab malik reaction on chaos in rajya sabha)

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.