Kirit Somaiya | “हे मला काही पटत नाही…”, किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवर आव्हाड काय म्हणाले?
jitendra Awhad on kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या या व्हिडीओवरून विधानसभेतही चर्चा झाली, विरोधी पक्षातील नेते अनिल परब यांनी जोरदार टीका केली. अशातच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. किरीट सोमय्यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली असून राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. किरीट सोमय्यांच्या या व्हिडीओवरून विधानसभेतही चर्चा झाली, विरोधी पक्षातील नेते अनिल परब यांनी जोरदार टीका केली. अशातच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नसल्याचं म्हणत आव्हाड म्हणाले.
राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2023
जितेंद्र आव्हाडांनी किरीट सोमय्यांचं नाव न घेतलं नाही. मात्र एकिंदरित एखाद्याचं वैयक्तिक आयुष्य असं उद्ध्वस्त करण्याचा अधिकारा कोणालाही नसल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे. आव्हाडांनी याबाबत ट्विट केलं आहे.