गुलाबराव जगतापांसाठी अजित पवार, जयंत पाटलांचा लोकल प्रवास!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आज मुंबई लोकलने प्रवास करणं पसंत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे  यांनी सीएसएमटी-कसारा या लोकलने प्रवास केला. माथाडी नेते गुलाबराव जगताप यांचा वाढदिवस आणि डोंबिवलीमधील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी डोंबिवलीपर्यंत लोकलने प्रवास केला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास करणं पसंत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या […]

गुलाबराव जगतापांसाठी अजित पवार, जयंत पाटलांचा लोकल प्रवास!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आज मुंबई लोकलने प्रवास करणं पसंत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे  यांनी सीएसएमटी-कसारा या लोकलने प्रवास केला. माथाडी नेते गुलाबराव जगताप यांचा वाढदिवस आणि डोंबिवलीमधील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी डोंबिवलीपर्यंत लोकलने प्रवास केला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास करणं पसंत केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या लोकलवारीने सर्वसामान्य प्रवासी आश्चर्यचकीत झाले. अचानक बडे नेते लोकलमध्ये चढल्याने प्रवाशांचीही एकच तारांबळ उडाली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माथाडी कामगार नेत्याच्या वाढदिवासाला ते सुद्धा लोकल रेल्वेने जात होते. त्यामुळे हा माथाडी कामगार नेता नेमका कोण, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली.

कोण आहेत गुलाबराव जगताप?

-गुलाबराव जगताप हे माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जातात.

-महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे ते कार्याध्यक्ष आहेत.

-गुलाबराव जगताप यांच्याच नेतृत्त्वात जुलै महिन्यात ठाण्यातील एका कंपनीत माथाडी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ करण्याचा करार झाला होता.

-काही दिवसांपूर्वी माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी वाशीत बनियान मोर्चा काढण्यात आला होता, यामध्येही गुलाबराव जगताप यांचा समावेश होता.

-माथाडी आणि सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीतर्फे 27 मार्च 2018 रोजी माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकाचा महामोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात गुलाबराव जगताप यांचा सहभाग होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.