AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभूतांवर नवी जबाबदारी?, विधानसभा, लोकसभेतील पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक

राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. (ncp meeting with party workers in mumbai)

पराभूतांवर नवी जबाबदारी?, विधानसभा, लोकसभेतील पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 12:06 PM

मुंबई: राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावण्यासाठी पक्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत राष्ट्रवादीने चर्चा सुरू केली आहे. या पराभूत उमेदवारांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ncp meeting with party workers in mumbai)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांनाच या बैठकीला बोलावण्यात आले आहे. यावेळी या उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल? याची चर्चाही या बैठकीत करण्यात येणार असून त्यानुषंगाने जबाबदाऱ्यांचं वाटपही करण्यात येणार आहे.

तसेच या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये कोरोना काळात झालेली कामे, राज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि ही कामे मतदारसंघापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यावरही या बैठकीत भर देण्यात येणार आहे. तसेच नाराजांचं म्हणणंही ऐकून घेण्यात येणार असल्यांच सूत्रांनी सांगितलं.

आऊट गोईंग सुरू होऊ नये म्हणून…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने अनेकांना आपण पक्षात अडगळीत फेकल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बरेच पदाधिकारी नाराज आहे. त्यातच भाजपने सत्ताधारी पक्षातील मिळेल त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने राष्ट्रवादीला आगामी काळात गळती लागू नये म्हणून या बैठकीच्या माध्यमातून पराभूतांना महत्त्व देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याचं चित्रं दुपारनंतरच स्पष्ट होणार आहे. (ncp meeting with party workers in mumbai)

संबंधित बातम्या:

सरपंच आरक्षण सोडतीला विरोध, हायकोर्टात याचिका, इच्छुकांची धाकधूक वाढली

मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराची महारेराच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग?

राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीची कायद्यात अस्पष्टता, केंद्राला नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

(ncp meeting with party workers in mumbai)

14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.