अब्दुल सत्तारांची आक्षेपार्ह टीका, मुंबईत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या काचा फोडल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या.

अब्दुल सत्तारांची आक्षेपार्ह टीका, मुंबईत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या काचा फोडल्या
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 4:03 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळेच संबंधित प्रकरण प्रचंड चिघळलं आहे. राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अब्दूल सत्तारच्या विरोधात निदर्शने दिली जात आहे. मुंबईतही तशाच प्रकारचे निदर्शने विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले.

“आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र बघितलेला आहे. अब्दूल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. त्यांना अशाप्रकारचं विधान करताना लाज वाटली नाही का?”, असा घणाघात विद्या चव्हाण यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण विद्या चव्हाण यांनी अब्दूल सत्तार जोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या बंगल्याबाहेर हटणार नाहीत, असा पवित्रा घेतला.

“आम्ही हटणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना विद्या चव्हाण काय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे ते चांगलं माहिती आहे. महिलांचा अपमान सहन करणार नाही”, अशी भूमिका विद्या चव्हाण यांनी मांडली.

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले पाहा व्हिडीओ?

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.