संजय राऊतांना मार्शलने भर संसदेत उचललं, तो सदस्यांवरील हल्लाच होता; शरद पवारांनी सांगितली आँखो देखी

राज्यसभेत झालेल्या गोंधळाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर माहिती दिली. सभागृहात घुसलेल्या मार्शलनी महिलांना धक्काबुक्की केली. (NCP President Sharad Pawar reaction on chaos in rajya sabha)

संजय राऊतांना मार्शलने भर संसदेत उचललं, तो सदस्यांवरील हल्लाच होता; शरद पवारांनी सांगितली आँखो देखी
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 4:21 PM

मुंबई: राज्यसभेत झालेल्या गोंधळाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर माहिती दिली. सभागृहात घुसलेल्या मार्शलनी महिलांना धक्काबुक्की केली. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अक्षरश: उचलले होते. यापूर्वी मी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. राज्यसभेत त्या दिवशी घडलेला हा प्रकार म्हणजे संसद सदस्यांवरील हल्लाच होता, असं शरद पवार यांनी सांगितलं. (NCP President Sharad Pawar reaction on chaos in rajya sabha)

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पेगाससवर चर्चा करण्यास केंद्राने मान्यता दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यावर चर्चा करण्यासाठी पहिल्या दिवसापासून आग्रह धरला. सत्ताधाऱ्यांनी विमा विधेयक आणलं. आम्ही त्यांना हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यास सांगितलं. त्यावर चर्चा व्हावी, ते घाईघाईत मंजूर होऊ नये, अशी आमची मागणी होती. पण त्यांनी ते विधेयक तसंच आणलं. त्यांनी तसंच आणलं म्हणून राज्यसभेतील महिला आणि पुरुष सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. काही सदस्य हे वेलमध्येही गेले होते हे मान्य आहे. माझी सीट समोर आहे. त्यामुळे मला प्रत्येक व्यक्ती काय करते हे दिसतं. पलिकडच्या बाजूही मला दिसत होत्या. पण जे रणकंदन झालं ते माझ्यासमोर झालं, असं पवार म्हणाले.

40 सुरक्षारक्षक आलेच कसे?

विमा विधेयकावर चर्चा करू नका, अशी मागणी केल्यानंतर काही लोक वेलमध्ये गेले. तेव्हा संसदेच्या इतिहासात आणि माझ्या 54 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी पहिल्यांदाच 40 सुरक्षा अधिकारी संसदेत आलेले पाहिले. त्यांनी फिजिकली सदस्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काँग्रेसच्या दोन महिला सदस्या पुढे गेल्या. त्यांनीही ढकलण्यात आले. त्यातील एक महिला खासदार खाली पडली. त्यावेळी सर्व सदस्य त्यांना मदत करायला गेले. त्यामुळे अधिक धक्काबुक्की झाली, असं सांगतानाच सुरक्षा दलाचा ताफ्याने बळाचा वापर केला. या सुरक्षा दलाने एकप्रकारे संसद सदस्यांवर हल्लाच केला. 40 सुरक्षारक्षक आलेच कुठून. एरव्ही दहाएक सुरक्षारक्षक संसदेत येतात. पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक आले, असंही ते म्हणाले.

म्हणजेच सरकारची भूमिका कच्ची होती

सत्ताधारी पक्षाचा नेता भूमिका मांडतो. पण त्यावर बोलायला सात मंत्री बसले. याचा अर्थ त्यांची भूमिका कच्ची होती. त्यांची बाजू कमकूवत होती हे स्पष्ट होतं. हे सुद्धा मी पाहत होतो. ते अॅक्शन घेऊ शकतील. कारण त्यांच्याकडे बहुमत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

असं कधीच झालं नव्हतं

तुमच्या जातीजमातीचे एक सदस्य आहेत. त्यांचं नाव संजय राऊत. ते माझ्या पलिकडेच होते. त्यांना अलगद उचलून धरलं. तुम्ही पाहिलं की नाही माहीत नाही. पण त्यांना फिजिकली उचललं. हे सर्व प्रकार तिथे झाले. हे कधीही असं झालं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं. (NCP President Sharad Pawar reaction on chaos in rajya sabha)

संबंधित बातम्या:

जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले, केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक, शरद पवारांचा हल्लाबोल

ओबीसींना आरक्षण कसे मिळणार?; शरद पवारांनी सांगितल्या कायद्याच्या 3 गोष्टी!

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता खुद्द शरद पवारांकडून उत्तर

(NCP President Sharad Pawar reaction on chaos in rajya sabha)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.