Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | शरद पवार यांची चाणाक्ष प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाच्या निकालानंतरची हवाच काढली

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी पवारांनी अतिशय चाणाक्ष प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar | शरद पवार यांची चाणाक्ष प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाच्या निकालानंतरची हवाच काढली
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 10:22 PM

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) शिवसेनेच्या (Shiv Sena) निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतरच्या वातावरणाची जणू काही हवाच काढलीय. निवडणूक आयोगाच्या निकालाने फार काही फरक पडणार नाही, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येत प्रतिक्रियेला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला नवा उमेद देण्यासाठी ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाचं उदाहरण दिलं आहे.

“हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतलं. ते चिन्ह लोकांनी मान्य केलं. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

उद्धव ठाकरेंनी काय-काय भूमिका मांडली?

‘महाराष्ट्रातली जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही’

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. “तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेला आहे. तो धनुष्यबाण कागदावरच आहे. ते चिन्ह आजही माझ्याकडे कायमचे माझ्याकडे राहणार आहे, तो तुम्हाला दाखवतोय एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘हा शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाण’

“शिवसेना ही अशी रेसिपी नाहीये. आजपर्यंत पहिल्या दिवसापासून जेव्हा सुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती हा धनुष्यबाण उल्लेखनी कामगिरी करतो. तसा धनुष्यबाण त्याच्यावरचा कुंकू सुद्धा आपण पाहू शकता. हा शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेल्या धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेनाप्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे. या धनुष्यबाणाचा तेज ती जी काय शक्ती आहे त्याला राहणार नाही. याची मला खात्री आहे मला विश्वास आहे”

‘असेल रावणाकडे पण धनुष्यबाण’

“असेल रावणाकडे पण धनुष्यबाण, पण शेवटी विजय हा जसा रामायणमध्ये रामाचा झाला आणि शंभर कौरव एकत्र आले म्हणून पांडू हरले नव्हते. सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे आणि सत्याचाच विजय हा आता आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना बघायला मिळेल.”

‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच’

“मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. अंध दृत्तराष्ट्र नाहीये तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा असं वस्त्रहरण कदापी खपवून घेणार नाही. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल लागेलच आणि दुसरी जी अपात्रतेची केसही तिथे चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार.”

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.