महाराष्ट्र, कर्नाटकात NIA चे छापे, अल कायदाच्या संपर्कानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

गलेलठ्ठ पगार, चांगली नोकरी, उच्च शिक्षणानंतर कर्नाटकातील तरुण आला अल कायदाच्या संपर्कात. आता NIA च्या जाळ्यात अडकला . महाराष्ट्रातील पालघर येथून एकाला ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकात NIA चे छापे, अल कायदाच्या संपर्कानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक
कर्नाटकात अटक केलेला आरोपीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 8:32 AM

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) महाराष्ट्रात आणि कर्नाटकात छापे टाकले. या छापेसत्रात बेंगळुरू येथून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. तसेच एनआयने (national investigation agency) मुंबई येथून एकाला ताब्यात घेतले आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मोहम्मद आरिफ हे त्याचे नाव आहे. आरिफ गेल्या दोन वर्षांपासून अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, असा एनआयएचा दावा आहे. एवढेच नाही तर तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तानला जाण्याच्या तयारीत होता.

अफगाणिस्तानात जाणार होतो

हे सुद्धा वाचा

आरिफला अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी संघटनेत सामील व्हायचे होते, परंतु एनआयएने त्याला आधीच बेंगळुरू येथून अटक केली. आरिफ बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याने इंटरनेटच्या माध्यमातून अल कायदाच्या हस्तकांशी संपर्क प्रस्थापित केला होता.जेव्हा जेव्हा आरिफला अल कायदाच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधायचा होता तेव्हा तो इंटरनेटच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधायचा. परंतु तो अजूनपर्यंत कोणत्याही कारवायांमध्ये सहभागी झाला नव्हता.

पालघरमध्ये छापे

मोहम्मद आरिफला बंगळुरू येथून शनिवारी सकाळी अटक केली. त्यानंतर NIA ने महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघरमध्येही शोधमोहीम राबवण्यात आली. पालघरमधील हमराज वर्सिद शेख याला ताब्यात घेतले. तो बोईसरमधील अवधनगर येथील सोमनाथ पैराडाइज सोसायटी राहतो. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. हमराज सौदी अरेबियात कामासाठी गेला होता आणि तो ISIS च्या संपर्कात होता तर मोहम्मद आरिफ हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.

एनआयकडे इनपुट

एनआयएला माहिती मिळाली होती की, दोन तरुण एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे परदेशातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आहे. हे दोघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा कट रचत होते. शनिवारी छापेसत्रादरम्यान त्यांच्यांकडून अनेक डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली.

कोलकाता येथेही झाली होती कारवाई

दहशतवादी संघटनेशी संपर्क साधण्याच्या आरोपाखाली एखाद्याला अटक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एनआयएने अलीकडेच कोलकाता पोलिसांनी पकडलेल्या दोन संशयित इसिसशी संबंधित दहशतवाद्यांची चौकशी केली होती. ते मोस्ट वॉन्टेडच्या यादीत अनेक दिवसांपासून होते. कोलकाता येथे पकडलेल्या संशयित दहशतवादी सद्दामची तपास यंत्रणेने चौकशी केली असता धक्कादायक खुलासे झाले. आरिफप्रमाणेच दहशतवादी सद्दामही गेल्या दोन वर्षांपासून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता. तो घरून काम करत होता.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.