VIDEO | अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?

स्फोटकं आढळलेल्या कारजवळ सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझे असल्याचा एनआयएला संशय आहे. (NIA scene recreates Sachin Vaze)

VIDEO | अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?
सचिन वाझे यांच्यासह सीन रिक्रिएट
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:48 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर घडलेल्या घटनांचे एनआयएकडून नाट्य रुपांतरण करण्यात आले. यावेळी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावले. एनआयए आणि फॉरेन्सिक टीमने अँटिलिया परिसर ब्लॉक करुन सीन रिक्रिएट केला. (NIA scene recreates with Sachin Vaze outside Mukesh Ambani residence Antilia)

‘ती’ व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय

फेब्रुवारीत मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं आढळली होती. यावेळचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं असता कारजवळ पीपीई किट घालून एक व्यक्ती चालताना दिसली होती. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझे असल्याचा एनआयएला संशय आहे.

एनआयएकडून कशी तयारी?

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली, त्या ठिकाणी एनआयए आणि पुणे फॉरेन्सिक टीम काल रात्री दाखल झाली. सुरुवातीला हा रस्ता ब्लॉक करण्यात आला. सीसीटीव्हीमध्ये जितका प्रकाश दिसतो, तितके दिवे सुरु करण्यात आले. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती ज्या मार्गावर चालली, तिथे एनआयएने रस्त्यावर काही खुणा केल्या.

सचिन वाझेंना ‘त्या’ व्यक्तीचं रुप

त्यानंतर, घटनेचं नाट्य रुपांतरण करण्यासाठी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सचिन वाझे यांना आणण्यात आलं. सीसीटीव्हीमध्ये पीपीई किट घातलेली व्यक्ती जशी दिसते, तसं रुप सचिन वाझेंना देण्यात आलं. त्यानंतर रस्त्यावर केलेल्या खुणांवरुन सचिन वाझे यांना चालण्यास सांगितलं गेलं. (NIA scene recreates with Sachin Vaze outside Mukesh Ambani residence Antilia)

‘त्या’ अँगलवर कॅमेरे लावून शूटिंग

सीसीटीव्हीमध्ये ज्या अँगलने संबंधित व्यक्ती कैद झाली, त्याच जागेवर फॉरेन्सिक टीमने कॅमेरे बसवले होते. जवळपास एक ते दीड तास सीन रिक्रिएशन सुरु होते. त्यानंतर एनआयएन सचिन वाझे यांना घेऊन परत गेली. फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर संबंधित व्यक्ती सचिन वाझेच आहे, की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सचिन वाझे प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन, सापडलेल्या 5 गाड्यांपैकी एक गाडी नवी मुंबईतील

वाझे प्रकरणात जप्त कारचे मूळ मालक शिवसेना पदाधिकारी, दोन वर्षांपूर्वीच गाडी विकल्याचा दावा

(NIA scene recreates with Sachin Vaze outside Mukesh Ambani residence Antilia)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.