Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही; निलेश राणेंची टीका

मराठा आरक्षणावरून भाजप खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद वाढताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी छत्रपतींवर टीका केली आहे. (nilesh rane taunt sambhaji chhatrapati over maratha reservation)

राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही; निलेश राणेंची टीका
sambhaji chhatrapati
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 10:10 AM

मुंबई: मराठा आरक्षणावरून भाजप खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद वाढताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी छत्रपतींवर टीका केली आहे. राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यावर संभाजी छत्रपती काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (nilesh rane taunt sambhaji chhatrapati over maratha reservation)

खासदार संभाजी छत्रपती यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावरून निलेश राणे यांनी ट्विट करून संभाजीराजेंवर टीका केली आहे. संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं. पण, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

काय झालं होतं भेटीत?

दरम्यान, काल संभाजी छत्रपती यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे. शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे म्हणाले होते.

मेटेंची टीका

संभाजीराजे आणि पवारांच्या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली होती. लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा 10 मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असं मेटे म्हणाले होते. त्यानंतर राणेंनी टीका केल्याने संभाजीराजे आणि भाजपमध्ये मतभेद वाढत असल्याचं दिसून येत आहे. (nilesh rane taunt sambhaji chhatrapati over maratha reservation)

संबंधित बातम्या:

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग कोल्हापुरमधून फुंकले जाणार, संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजे छत्रपती कडाडले

(nilesh rane taunt sambhaji chhatrapati over maratha reservation)

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.