“तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करतो”; “या’ सभेआधीच उद्धव ठाकरे यांचा टीझर रिलीज…

उद्धव ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार आहेत. त्याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याआधीच ही टीझर रिलीज झाल्याने लोकांना त्यांची उत्सुकता आणखी लागून राहिली आहे.

तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करतो; या' सभेआधीच उद्धव ठाकरे यांचा टीझर रिलीज...
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:42 PM

मुंबईः माझी तयारी निखाऱ्यावरती चालण्याची आहे, तुमची तयारी आहे का? मला माझे सैनिक अन्यायावर वार करणारे सैनिक पाहिजेत, पाठित वार करणारे सैनिक नको आहेत. आणि तुम्ही फक्त मला वज्रमूठ द्या दात पाडायचं काम मी करून दाखवतो ठाकरे गटाच्या विरोधकांवर असे घणाघात घालणारी ही वाक्यं आहेत उद्धव ठाकरे यांच्या निष्ठा मातोश्रीशी आणि उमान भगव्याशी या टीझरमधील. निष्ठा मातोश्रीशी आणि इमान भगव्याशी या टीझरमध्य उद्धव ठाकरे यांच्या वेगवेगळ्या सभेतील त्यांच्या या व्हिडीओमुळे आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

कारण उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची विराट सभा होत आहे. त्याची आता जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या टीझरमधूनही ठाकरे गटाच्या विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यामुळे निष्ठा मातोश्रींशी आणि इमान भगव्याशी या टीझरमधून शिवसैनिकांना वेगवेगळ्या पद्धतीने साद घालण्यात आली आहे. ज्या पद्धतीने शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे विरोधकांवरही तोफ डागण्यात आली आहे. मला माझे सैनिक अन्यायावर वार करणारे पाहिजे पाठीत वार करणारे सैनिक नको म्हणत त्यांनी बरोबर शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यामुळे टीझरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई बाहेर ही खेडमधील पहिलीची सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्धव ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार आहेत. त्याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याआधीच ही टीझर रिलीज झाल्याने लोकांना त्यांची उत्सुकता आणखी लागून राहिली आहे.

निष्ठा मातोश्रीशी आणि इमान भगव्याशी या  टीझरमधील उद्धव ठाकरे यांचे एक वाक्य सध्या खूप गाजत आहे. तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करतो असं उद्धव ठाकरे या टीझरमध्ये आवाहन करत आहेत. त्यामुळे या टीझरचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.