Nitesh Rane : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या रंगरंगोटीवरून नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, पत्रात नेमकं काय?

या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता 30 एप्रील रोजी 12 वर्षे पुर्ण होतील परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात, असा आरोप त्यांनी केला आहे.

Nitesh Rane : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या रंगरंगोटीवरून नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, पत्रात नेमकं काय?
उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 3:28 PM

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि राणे कुटुंबियांचं राजकीय युद्ध सर्वांनाच परिचित आहे. म्हणून ना राणे कधी ठाकरेंवर हल्लाबोल करण्याची संधी सोडतात, ना ठाकरे कधी राणेंवर हल्लाबोल करण्याची संधी सोडतात. यावेळी या संघर्षाला पुन्हा धार येण्याला कारण ठरलंय. संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची रंगरंगोटी आणि सजावट, कारण यावरूनच आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना खरमरीत पत्र लिहलंय. या पत्रात ते लिहितात…मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 109 मराठी हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. या हुतात्म्यांच्या बलीदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय कारण शिवाजी पार्क येथे या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता 30 एप्रील रोजी 12 वर्षे पुर्ण होतील परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात, असा आरोप त्यांनी केला आहे.

कलादालनावर विस्मरणाचा अंधार

तसेच महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना हे कलादान अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, ना इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगासाठी केला जातोय, असेही ते पत्रात म्हणाले आहेत.

ठाकरे कुटुंबियांची प्रॉपर्टी करण्याचा घाट?

स्व.बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच. आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दालन पर्यटकांना खुले करावे

कारण पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचीत का गेला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कलादालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्र्च्या आस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहून 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचीत समावेश करावा आणि आपला हेतूवर उठलेलं शंकेच मोहोळ शांत करावं. जय महाराष्ट्र, अशा आशायाचे खरमरीत पत्र नितेश राणे यांनी लिहिले आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय भूमिका घेते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.