शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला; संजय राऊतांनी रोखठोक ठणकावले

शिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. या चर्चांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेना-भाजप एकत्रं येणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीला भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत.

शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला; संजय राऊतांनी रोखठोक ठणकावले
शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला: संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:03 AM

मुंबई: शिवसेना-भाजप (shivsena-bjp) भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. या चर्चांना शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेना-भाजप एकत्रं येणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीला भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी (mahavikas aghadi) हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक या स्तंभातून ही भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर अभद्र टीका करणाऱ्यांची तोंडे 23 जानेवारीस पूर्ण वाकडी झाली. उद्धव ठाकरे समोर आले व भाजपच्या मुखवट्यावरच हल्ला केला! उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने संभ्रम दूर झाला. शिवसेना आणि भाजपचे ‘आतून काही सुरू आहे’ या अफवांना पूर्णविराम मिळाला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर भाजप नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती. उद्धव ठाकरे कोठे आहेत? अशी शंका चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांनी उपस्थित केली. विरोधकांच्या सर्व ‘लघुशंका’ 23 जानेवारी रोजी त्यांच्यावरच उलटल्या, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे.

जन्मास येऊन काय दिवे लावले?

भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय शिवसेनेची वाढ शक्यच नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी. शिवसेनेचा जन्म 1966 सालातला. भारतीय जनता पक्षाने 1980 साली डोळे उघडले. त्यामुळे भाजपच्या मदतीने शिवसेना उभी राहिली आणि वाढली हा दावा चुकीचा आहे. कोण कोणाच्या आधी जन्मास आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा हल्ला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर चढवला.

भाजपचा वेळ राजभवन परिसरात जाणार

उद्धव ठाकरे यांचे भाषण व त्यानंतर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभ्रम पूर्णपणे दूर झाला. ठाकरे व त्यांचे काही नेते भारतीय जनता पक्षाशी आतून संधान बांधून आहेत व सध्याचे सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे हे मळभ दूर झाले. आता एकत्र येणे शक्य नाही व फडणवीस यांच्या कडक भाषेतील उत्तराने कोणतीही खिडकी उघडी आहे असे दिसत नाही. आहे त्या स्थितीतच राज्य पुढे चालवले जाईल व भारतीय जनता पक्षाचा बराचसा वेळ यापुढे राजभवनाच्या परिसरातच जाईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

Rajesh Tope :तज्ज्ञांच्या मते कोरोना मार्चच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येणार, राजेश टोपेंनी नेमकं काय सांगितलं?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी उदय सामंत कोर्टात जाणार?; कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार निर्णय

Wine in Maharashtra: किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल; आठवलेंनी उडवली ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.