अमरावतीत रुग्ण संख्या घटली, मग लॉकडाऊन का?, आकडेवारी देत यशोमती ठाकूर यांनी आघाडी सरकारला हाणले
राज्यातील आघाडी सरकारने राज्यात सरसकट लॉकाडऊन जाहीर केला आहे. (no need lockdown in amravati, yashomati thakur wrote cm uddhav thackeray)
मुंबई: राज्यातील आघाडी सरकारने राज्यात सरसकट लॉकाडऊन जाहीर केला आहे. मात्र, अमरावतीतील रुग्ण संख्या घटलेली असतानाही अमरावतीत लॉकाडाऊन लागू करण्यात आल्याने त्याला अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कडाडून विरोध केला आहे. रुग्णसंख्या कशी घटली याची आकडेवारीच देऊन ठाकूर यांनी ठाकरे सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. (no need lockdown in amravati, yashomati thakur wrote cm uddhav thackeray)
राज्यात सरकसकट लॉकडाऊन लागू केल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अमरावतीतील कोरोना परिस्थिती आकडेवारीसह अवगत केली आहे. कोणताहील अभ्यास न करता अमरावतीतही लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे ठाकूर या संतप्त झाल्या आहेत. गेल्याच महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन झाला होता. त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे रुग्ण संख्याही प्रचंड घटली. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असताना जिल्ह्यात परत लॉकडाऊन का? असा सवालच ठाकूर यांनी केला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यानेच लॉकडाऊनला विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काय आहे पत्रात?
यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना तीन पानी पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 15 फेब्रुवारीपासून ते 5 एप्रिलपर्यंतची अमरावतीतील कोरोना रुग्णांची संख्या दिली आहे. तसेच 15 फेब्रुवारीपासून ते 5 एप्रिलपर्यंतचा दररोजचा पॉझिटिव्हीटी रेटही दिला आहे.
काय म्हटलंय पत्रात?
अमरावतीत कोरोना रुग्ण वाढल्यानंतर बाजारपेठा, मॉल्स, मार्केट बंद ठेवण्यात आले होते. तसेच जीवनावश्यक सेवा सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दररोज 500 ते 700 रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, 30 मार्चनंतर या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सध्या ही रुग्णसंख्या 200 ते 250 पर्यंत आली आहे. मात्र, तरीही मंत्रालयातून आदेश आल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, मार्केटस आणि मॉल्ससह सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. जलतरण तलाव, वॉटर पार्क, व्हिडीओ गेम पार्लर, मनोरंजन पार्क, क्लब, व्यायामशाळा, आदी सर्व गोष्टीही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व आस्थापना आणि विक्रेत्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हा व्यापारी वर्गाने त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली लक्षणीय घट आणि जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा. तसे आदेशच आपण काढावेत, अशी मागणी ठाकूर यांनी या पत्राद्वारे केली आहे.
ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले
ठाकूर यांच्या या पत्रावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले. ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहे. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. (no need lockdown in amravati, yashomati thakur wrote cm uddhav thackeray)
ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले… ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहे. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे… pic.twitter.com/4Ze7nLDmry
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 7, 2021
संबंधित बातम्या:
कुठे लॉकडाऊन तर कुठे नाईट कर्फ्यू, देशातील कोणत्या शहरात काय?; वाचा सविस्तर
कोरोनाची लस सर्वांना सरसकट मिळणार का?; केंद्र सरकारने दिले ‘हे’ उत्तर
(no need lockdown in amravati, yashomati thakur wrote cm uddhav thackeray)