“सगेसोयरे” अधिसूचना संदर्भात चार लाखांहून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त

मराठा आरक्षणाचा मुद्द दिवसेंदिवस तापत चालला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. सरकारने मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देणार असल्याची माहिती समजत आहे. सामाजिक न्याय विभागाने 'सगेसोयसरे' अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना काढली होती. त्याविरोधात लाखो हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत.

सगेसोयरे अधिसूचना संदर्भात चार लाखांहून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 9:46 PM

मोहन देशमुख, मुंबई ‍‍दि.17 : सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम 2000 नियम 2012 मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना दि 26 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 16 फेब्रुवारी 2014पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती आणि सुचना मागवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत अंदाजित सुमारे चार लाखांहून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या हरकती आणि सूचनांची सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग तसेच मध्यवर्ती टपाल नोंदणी शाखा, मंत्रालय, मुंबई या विभागांच्या कार्यालयातील सुमारे 300 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 या सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी कार्यालयात हजर राहून याबाबत प्रक्रिया करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं भर सभेतून वचन दिलं होतं. आता येत्या 20 तारखेला सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर…

मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे. निवृत्त न्यायमूर्तींची या मसुद्यासाठी मदत घेतली होती. कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे. कुणबी वगळून आता राज्यात 32 टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. मराठा समाजाला 13 आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.