AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुणेकरांची रांगेतली वेळ वाढणार? ओला-उबेरला आता बुकींगपूर्वी तुमचं ड्रॉप लोकेशन कळणार

ओला- उबेर सारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या वाहतूक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मात्र या बदलाचा फटका हा प्रवाशांना बसत असून, प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई-पुणेकरांची रांगेतली वेळ वाढणार? ओला-उबेरला आता बुकींगपूर्वी तुमचं ड्रॉप लोकेशन कळणार
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 8:15 AM

मुंबई : ओला- उबेर सारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या वाहतूक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मात्र या बदलाचा फटका हा प्रवाशांना बसत असून, प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या वाहतूक धोरणानुसार आता कॅप चालकांना तुम्हाला कुठे जायचे आहे त्याचे  लोकेशन आधीच कळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जवळच कुठे तरी जायचे असेल तर बूक झालेली ट्रीप कॅन्सल करण्याचा अधिकार हा कॅप चालकांना मिळाला आहे.

कंपनीकडून नव्या नियमाबाबत स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून ओला-उबेरच्या राइड मोठ्याप्रमाणात रद्द होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. अखेर याप्रकरणी आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आम्ही आमच्या वाहतूक धोरणांमध्ये काही बदल केले असून, नव्या धोरणानुसार आता तुम्हाला कुठे जायचे आहे, ते देखील कॅप चालकाला कळणार आहे. त्यानंतर ही बुकिंग स्वीकारायची की नाही, हे ठरवण्याचा देखील अधिकार त्याला देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कॅप चालकांचा फायदा होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

नव्या नियमांचा प्रवाशांना फटका 

दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये ट्राफीकची समस्या मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हाला जवळच कुठेतरी जायचे आहे. तुम्ही त्यासाठी ओला बुक केली, आणि रस्त्यात ट्रॅफीक लागली तर अशा परिस्थितीमध्ये वाहनचालकांचे नुकसान होते. मात्र आता त्याला तुम्हाला कुठे जायचे आहे, हे  देखील कळणार असल्याने, तुम्हाला जीथे जायचे आहे ते अंतर आणि रस्त्यावर किती रहदारी आहे हे ठरवून  त्याला निर्णय घेता येणार आहे. यामुळे जरी वाहनचालकाचा फायदा होणार असला, तरी याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसणार आहे.

संबंधित बातम्या 

St workers : एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचं निलंबन सुरूच, दिवसभरात हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई

Jalgao : आमचा 25 वर्षांचा संसार मोडला, गिरीश महाजन यांचा टोला, महाजनांना जयंत पाटील, नवाब मलिकांचं प्रत्युत्तर

अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात....
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट.
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल....
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल.....
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.