Omicron Variant : महाराष्ट्रातही ‘ओमिक्रॉन’चा धोका? दक्षिण आफ्रिकेवरुन डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह!
आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिके(South Africa)वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यामुळे चिंता वाढली आहे. अशावेळी आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत.
डोंबिवलीत आढळून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
कर्नाटकात एकाच कॉलेजमधील 281 जणांना कोरोना
कर्नाटकमधील धारवाढ येथे एकाच कॉलेजमधील 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एसडीएम मेडीकल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलंय. यातील केवळ 6 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली असली आणि इतरांना लक्षणं नसली तरी अचानक झालेल्या वाढीनं खळबळ उडवून दिली आहे. कोरोना झालेल्यामध्ये विद्यार्थी शिक्षक कर्मचारी असा सर्वांचा समावेश आहे. शुक्रवारी एका दिवसात 99 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोड उडाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला असतानाच अचानक एवढी रुग्णवाढ म्हणजे दुष्काळात 13वा महिना आल्यासारखे आहे.
‘लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
इतर बातम्या :