Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Variant | मुंबईकरांनो सावधान! राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक 27 टक्के सक्रिय रुग्ण मुंबईतच

मुंबईत सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी असली तरी राज्यातील सर्वाधिक 27 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण अद्यापही मुंबईतच आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना आणखी काळजी घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसंख्या अधिक असल्याकारणाने शहरात अजूनही दररोज 200 ते 250 नवे रुग्ण सापडत आहेत.

Omicron Variant | मुंबईकरांनो सावधान! राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक 27 टक्के सक्रिय रुग्ण मुंबईतच
corona virus
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 9:24 AM

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचं संकट (Corona Virus) आहे. आता कुठे लशीच्या शोध आणि लसीकरणानंतर कोरोनाचे संकट कमी होत असल्याचं वाटत होतं. मात्र, आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) जगभरात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. या नव्या कोरोना व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले आहेत. तसेच, मुंबईतही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Mumbai Airport) भेट देत पहाणीही केली.

मुंबईत सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी असली तरी राज्यातील सर्वाधिक 27 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण अद्यापही मुंबईतच आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना आणखी काळजी घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसंख्या अधिक असल्याकारणाने शहरात अजूनही दररोज 200 ते 250 नवे रुग्ण सापडत आहेत.

एकीकडे ओमिक्रॉनच्या संकटाचे ढग गडद होत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील परिस्थितीही नियंत्रणात नाहीये. आरोग्य विभागाने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 27 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 8237 सक्रिय रुग्ण होते. ज्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे 2250 मुंबईत आहेत. तर पुण्यात 2077, ठाण्यात 1060, अहमदनगरमध्ये 802 आणि नाशकात 396 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सर्वाधिक कोव्हिड चाचण्या होत आहेत. लोकसंख्या पाहता रुग्ण देखील आढळून येत आहेत. परंतु जर आपण पॉझिटीव्हीटी दराबद्दल बोललो तर एकूण चाचणीच्या 1 टक्के किंवा त्याहून कमी जणांचा अहवाल पॉझिटीव्ह येत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत आहे. गेल्या 7 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही चांगली घट झाली आहे. 20 नोव्हेंबरला मुंबईत 3378 सक्रिय रुग्ण होते, परंतु 27 नोव्हेंबरला सक्रिय रुग्णांची संख्या 2050 वर आली आहे. पुण्यात 2163 वरुन 2077 वर, ठाण्यात 1255 वरून 1060 वर, नाशिकमध्ये 463 वरून 397 सक्रिय रुग्णांवर आले आहेत.

परदेशातून आलेला एकही प्रवासी आरटीपीसीआर झाल्याशिवाय विमानतळाबाहेर पडणार नाही – महापौर

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आपण त्यावर मात केली. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, सध्या तरी राज्यात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र मागचा अनुभव पाहाता आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम जारी केले आहेत. परदेशातून आलेला एकही प्रवासी मुंबई विमानतळावरून आरटीपीसीआर झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. त्यासाठी 50 तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच ज्या देशात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक आहे, अशा देशातून भारतामध्ये परतणाऱ्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच मुंबईकरांनो घाबरू नका, फक्त काळजी घ्या असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

लस न घेणाऱ्यांवर बीएमसी कारवाईचा बडगा उगारणार

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. ज्यांनी अद्यापही दोन लस घेतलेल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, लस न घेणाऱ्यांना प्रवास आणि सार्वजिनक वाहनांतून प्रवासही करता येणार नाहीये. तर सिनेमाघर, मॉल, थियेटर, दुकानं इत्यादीमध्ये काम करत असणाऱ्यांवरही बीएमसी कारवाई करणार आहे.

लसीचे दोन डोज न घेणाऱ्यांवर कारवाई करा, आयुक्तांचे आदेश

बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जाऊन लसीचे दोन डोज न घेणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले की, कामावर जाण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक करण्यात आले आहेत. नागरिक निष्काळजीपणा करत असल्याचं निदर्शनास येत आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क न लावणे, सॅनिटायझिंग यांसारख्या कोरोना नियमांना नागरिक गंभीरपणे घेत नाहीये.

संबंधित बातम्या :

ओमिक्रॉनची भीती, मुंबईतील पहिली ते चौथीचे वर्ग बंद राहणार, BMC चा मोठा निर्णय

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई विमानतळाला भेट; मुंबकरांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....