Aaditya Thackeray | जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक, अर्भकाला मदतीचा हात, आदित्य ठाकरेंचे वाढदिवशी स्तुत्य पाऊल
आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या माध्यमातून नवजात बाळाचे पिता अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. (Aditya Thackeray Helps New Born Baby with three blockages in heart)
मुंबई : जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात मिळाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. (Aditya Thackeray Helps New Born Baby with three blockages in heart)
घणसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज होते. मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या अर्भकाची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे.
बाळाच्या हृदयात 3 ब्लॉकेज आणि एक छिद्र होते. ऐरोलीच्या मनपा रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाच्या जीवाला जन्मापासूनच धोका असल्याचं सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. त्याला नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने अब्दुल आपल्या मुलाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन आला.
हेही वाचा : Aaditya Thackeray | नको हार-तुरे, नको केक, राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही मोठा निर्णय
बाळाच्या वडिलांकडे उपचार करुन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्रस्त पित्याने अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्याने त्याने पित्याची व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली.
आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. इतकंच नाही, तर यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून पित्याने आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आज म्हणजे 13 जूनला असतो.
ठाणे पालिकेकडून गर्भवतीला चुकीचे ‘कोरोना’ रिपोर्ट, रुग्णालयासाठी दिवसभर वणवण, मनसे मदतीला https://t.co/W4T913HZ9v @mnsadhikrut @avinash_mns #Thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
(Aditya Thackeray Helps New Born Baby with three blockages in heart)