मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव, कैद्यापासून 6 जेल पोलिसांना बाधा
मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील एका 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर, त्याच्या संपर्कातील 6 जेल पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता विविध जेलमध्येही कोरोनाने (Prisoner Corona Positive Arthur Road jail) शिरकाव केला आहे. मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील एका 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर, त्याच्या संपर्कातील 6 जेल पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
धक्कादायक म्हणजे विविध व्याधी असलेल्या बाधित कैद्याच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्या संपर्कातील 6 जेल पोलिसांची कोरोना चाचणी केली असता, ते सुद्धा पॉझिटिव्ह आढळले.
कोरोनामुळे मृत्यू झालेला कैदी हा कच्चा कैदी होता. जामीन न मिळाल्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या कैद्याच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्याला जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्या संपर्कात हे पोलीस आले होते.
यानंतर या कैद्याला 2 मे रोजी अर्धांगवायूचा झटका (Prisoner Corona Positive Arthur Road jail) आला. त्यानंतर त्याला पुन्हा जे. जे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी त्याची स्वॅब टेस्ट घेतली असता, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
या कैद्यासोबत असलेल्या इतर सहा जेल पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यानंतर खबरदारी म्हणून हा कैदी असलेला यार्ड कंटेन्मेंट करण्यात आला आहे. तसेच या कैद्याला रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर जवळपास 150 कैद्यांची स्वॅब टेस्टही घेण्यात आली आहे.
ऑर्थर रोड जेलमध्ये 800 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत या ठिकाणी चौपट म्हणजे जवळपास 3600 कैदी आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडणे ही प्रशासनासाठी मोठी धोकादायक बाब ठरु शकते.
हेही वाचा : राज्यातील 5 कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन, कैद्यांसह अधिकारीही आतमध्ये बंद
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहात ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ही पाच कारागृहे लॉकडाऊन राहणार आहेत.
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार पार
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 758 वर पोहोचली आहे. तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत काल (6 मे) 769 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 714 वर पोहोचला आहे. तर 374 जण ठणठणीत बरे झाले आहेत.
तर दुसरीकडे गेल्या 24 तासात मुंबईत 25 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनामुळे एकूण 412 जणांचा मृत्यू झाला (Prisoner Corona Positive Arthur Road jail) आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी, एका रस्त्यावर एकालाच मुभा
आधी पत्र, आता अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, उद्धव ठाकरे म्हणतात…