मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये राखीव प्रवेशाची ऑनलाईन सोडत प्रक्रिया संपन्न

आपल्या पाल्याची प्रवेशाची स्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित पालकांनी आरटीई संकेतस्थळावर माहिती पहावी. तसेच निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये राखीव प्रवेशाची ऑनलाईन सोडत प्रक्रिया संपन्न
मराठी शाळांमध्ये आता "हॅपीनेस करिक्युलम"!Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 8:17 PM

मुंबई : शिक्षण हक्क अधिनियमानुसार (Right to Education Act) बृहन्मुंबईतील एकूण 341 पात्र खासगी विना-अनुदानित शाळांमध्ये (Non-granted schools) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्या 25 टक्के प्रवेश ऑनलाईन लॉटरी पद्धतीने मिळण्यासाठी पुणे येथे ऑनलाईन सोडत (Online Lottery) प्रक्रिया पार पडली. आपल्या पाल्याची प्रवेशाची स्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित पालकांनी आरटीई संकेतस्थळावर माहिती पहावी. तसेच निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. सोडतीमध्ये पाल्याची निवड होऊन देखील पडताळणी समितीकडे पालकांनी संपर्क न साधल्यास प्रवेश रद्द समजण्यात येईल.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता पात्र खासगी विना-अनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्या 25 टक्के प्रवेश ऑनलाईन सोडत (लॉटरी) पद्धतीने मिळण्यासाठी पालकांद्वारे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एस.एस.सी बोर्डाच्या 282 आणि अन्य बोर्डाच्या 59 अशा एकूण 341 पात्र खासगी विना-अनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी 6 हजार 451 जागांकरिता 15 हजार 50 अर्ज प्राप्त झाले.

पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी

दरवर्षीप्रमाणे आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) पुणे स्थित महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे बुधवार दिनांक 30 मार्च 2022 रोजी काढण्यात आली. सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी आरटीई संकेतस्थळ (पोर्टल) वर जाहीर होणार आहे. याबाबतचे लघूसंदेश (एस. एम. एस.) पालकांना प्रवेश प्रणालीद्वारे प्राप्त होतील. पालकांनी केवळ लघूसंदेश (एस. एम. एस.) वर अवलंबून राहू नये. आरटीई संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी. सोडतीद्वारे निवड झालेल्या पालकांनी आपल्या लॉगइनवरुन ऍडमिट कार्ड (Admit Card) ची प्रत, आवश्यक मूळ कागदपत्र व त्यांची छायांकीत प्रत या सर्व कागदपत्रांची तपासणी संबंधित पडताळणी समितीकडून दिलेल्या कालावधीत करून घेणे आवश्यक आहे.

बाहेरगावी असलेल्या पालकांनी ई-मेल, व्हॉट्सऍपद्वारे संपर्क साधावा

मात्र, काही कारणास्तव पालक बाहेरगावी असतील तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपर्क साधावा. सोडतीमध्ये निवड होऊनही पडताळणी समितीकडे संपर्क न साधणाऱया पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांचा प्रवेश देखील रद्द करण्यात येणार आहे. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये. त्याचप्रमाणे शासनाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

प्रवेशाबाबत अडचण उद्भवल्यास, पडताळणी समितीने किंवा शाळेने सहकार्य न केल्यास एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका उपशिक्षणाधिकारी (खासगी प्राथमिक शाळा विभाग) यांचे कार्यालय, करीरोड, मुंबई येथील संबंधित विभाग निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अन्य बोर्डाच्या शाळांसाठी शिक्षण निरीक्षक, महाराष्ट्र शासन (उत्तर, दक्षिण व पश्चिम) आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नी रोड (पश्चिम) येथे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’, सुजात आंबेडकरांच्या राज ठाकरेंवरील टीकेला शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर

Ajit Pawar: तर आधी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; अजित पवारांच्या विधानाचे संकेत काय?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.