कोरोना रोखण्यासाठी लस प्रभावी, मुंबईत दोन डोस घेतलेले फक्त 26 जण बाधित

मुंबईत दुसऱ्या लाटेत चार लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यात पहिला डोस घेऊनही 10 हजार 500 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. (Only 26 people who took the second dose in Mumbai Infected by corona)

कोरोना रोखण्यासाठी लस प्रभावी, मुंबईत दोन डोस घेतलेले फक्त 26 जण बाधित
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 8:16 AM

मुंबई : मुंबईत दुसऱ्या लाटेत चार लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यात पहिला डोस घेऊनही 10 हजार 500 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. तर दुसरा डोस घेतलेल्या फक्त 26 जणांनाच कोरोना झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. यामुळे कोरोनामुक्तीसाठी लसीकरण किती आवश्यक आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. (Only 26 people who took the Corona Vaccine second dose in Mumbai Infected by corona)

दुसऱ्या लाटेत 4 लाख लोक कोरोनाबाधित

मुंबईत फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यावेळी दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या ही 11 हजारावर पोहोचली होती. तर दुसऱ्या लाटेत 4 लाख लोक कोरोनाबाधित झाले. या दरम्यान, मुंबईत कोरोनावरील लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवण्यात आली. वाढत्या कोरोनामुळे लसीकरणाचे महत्त्व लोकांच्या लक्षात आल्याने आपोआपच लसीकरणाचे प्रमाण वाढले.

कोरोनाला रोखण्यासाठी लस प्रभावी

सध्या राज्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनची लस दिली जात आहेत. यामध्ये पहिल्या डोस घेतल्यानंतरही 10 हजार 500 जणांना कोरोना झाला. मात्र दुसरा डोस घेतलेल्या अवघ्या 26 जणच बाधित झाले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे कोरोनाची लस कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक 

राज्यात लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. मात्र तरी लसीकरणानंतरही खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.

रोज दीड लाखांवर लसीकरण करण्याचे लक्ष्य

सध्या लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दररोज 60 ते 70 हजाराहून अधिक जणांचे लसीकरणे केले जाते आहे. येत्या काही दिवसात हा वेग आणखी वाढवला जाणार आहे. पुरेसा लशींचे डोस उपलब्ध झाल्यानंतर रोज दीड लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न असेल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

(Only 26 people who took the Corona Vaccine second dose in Mumbai Infected by corona)

संबंधित बातम्या : 

तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल: उद्धव ठाकरे

मुंबईकरांना दिलासा, आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचणी होणार, अवघ्या दोन दिवसात मिळणार रिपोर्ट

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.