“रोज ईडी लावणे, फोडाफोडी करायची हाच भाजपचा कार्यक्रम”; काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला

जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हे प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारावर बोलणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

रोज ईडी लावणे, फोडाफोडी करायची हाच भाजपचा कार्यक्रम; काँग्रेस नेत्याने भाजपवर निशाणा साधला
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:05 PM

यवतमाळः गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका करत त्यांनी भाजपच्या राजकीय खेळी कशा असतात हेच त्यांनी दाखवून दिले. भाजपवर टीका करतान त्यांनी म्हटले आहे की, भाजपकडून सातत्याने बहुजन समाजाला डावललण्याची मानसिकता भाजपकडून ठेवण्यात आली आहे.

सध्या भाजपमध्ये दुसऱ्याची घरे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जेव्हा भाजपचे घर फुटेल तेव्हा भाजपला दुसऱ्याची घर फोडण्याचे दुःख कळणार असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

आज देशात अनेक प्रश्न आहेत, मात्र त्याकडे भाजपकडून दुर्लक्ष केले जात आहे. बेरोजगारी, महागाई, बेकारी असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत असूनही भाजप मात्र मुख्य मुद्यांना बगल देत डावलत असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले की, सरकार पडणार की नाही यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही.

कारण मी संविधान मानणार कार्यकर्ता आहे. भविष्य करणारे ते आहेत मी संविधानाच्या शेड्युल 10 नुसार जे नॉर्म अपात्रतेची असतात ते नॉर्म 16 आमदारांना लागू होतात. आणि त्या प्रमाणे निर्णय होईल म्हणून हे सरकार पडेल असे सांगतो असंही त्यांनी यावेळी म्हटले.

नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी आपण संविधान मानणाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे संविधानविरोधी वक्तव्य करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले. नागरिकांचे प्रश्न बाजूला ठेऊन नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हाच कार्यक्रम भाजपकडून सुरू आहे.

जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून ईडी, सीबीआयची भीती दाखवायची हे प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारावर बोलणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कालीचरण महाराज यांनी हिंदूंनी हिंदुत्वासाठी एकत्र यावे असे आव्हान केले आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी त्यांच्या संतपणावरच सवाल उपस्थित केला आहे.

कालीचरण महाराज हे खरे संत असतील तर त्यावर बोलू शकत नाही तो कुठला संत आहे हे माहिती नाही भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होत नाही. महाराज यांना एक परिभाषा असते, धर्म प्रचार करणाऱ्यांनी राजकीय मत महाराज व्यक्त करत असतील तर महाराज आहेत की नाही हे पाहावे लागेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.