नवी मुंबईत मशीद बांधण्याला विरोध, नागरिक रस्त्यावर
समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : सानपाड्यातील नागरिकांनी मशीद बांधण्यास विरोध केला आहे. सानपाड्यातील सेक्टर-8 येथे मशीद प्रस्तावित आहे. याविरोधात अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाच्या वतीने विरोध करण्यात आला. सायन-पनवेल महामार्ग अडवून नागरिकांनी निदर्शनं केली. सानपाडा सेक्टर-8 येथे सिडकोने धार्मिक स्थळ मुस्लीम संस्थेला भूखंड दिला आहे. या भूखंडावर मशिदीची उभारणी केली जाणार आहे. मात्र, […]

समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : सानपाड्यातील नागरिकांनी मशीद बांधण्यास विरोध केला आहे. सानपाड्यातील सेक्टर-8 येथे मशीद प्रस्तावित आहे. याविरोधात अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाच्या वतीने विरोध करण्यात आला. सायन-पनवेल महामार्ग अडवून नागरिकांनी निदर्शनं केली.
सानपाडा सेक्टर-8 येथे सिडकोने धार्मिक स्थळ मुस्लीम संस्थेला भूखंड दिला आहे. या भूखंडावर मशिदीची उभारणी केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच सानपाड्यातील रहिवाशी संघाने विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
मुस्लिमांच्या मशिदीला विरोध नसून, सानपाड्यात मोठ्या संख्येने हिंदू लोकसंख्या आहे. मुस्लिमांची संख्या फारच कमी आहे, त्यामुळे मशिदीसाठी इतरत्र भूखंड देण्यात यावा, अशी भूमिका सानपाड्यातील रहिवाशी संघाने घेतली आहे.
सानपाडा रहिवाशी संघाकडून सायन-पनवेल महामार्ग रोखण्याआधी गणेश मंदिरात महाआरतीही करण्यात आली. मोठ्या संख्येने रहिवाशी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत आंदोलनात सहभागी झाले. यावेळी सामूहिक मुंडन करुन देखील आंदोलन करण्यात आले.
बातमीचा व्हिडीओ :