मुंबईसह नवी मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, पालिकेकडून ऑक्सिजन निर्मिती

मुंबईसह नवी मुंबईतील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी या दोन्ही महापालिकेने हे पाऊल उचललं आहे. (Oxygen production in mumbai)

मुंबईसह नवी मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, पालिकेकडून ऑक्सिजन निर्मिती
मुंबई महापालिका- नवी मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 8:31 AM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नवी मुंबईसह ठिकठिकाणी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेने ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह नवी मुंबईतील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी या दोन्ही महापालिकेने हे पाऊल उचललं आहे. (Oxygen production by Mumbai and Navi Mumbai Municipal Corporation)

मुंबईत पालिकेकडून ऑक्सिजनची निर्मिती

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, म्हणून महापालिकेने हे पाऊल उचलेल आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटर, कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, गोवंडीतील शताब्दी रुग्णालय अशा जवळपास 12 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबईतही ऑक्सिजन निर्मिती

तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेनेही ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चाचपणी केली आहे. नवी मुंबईत ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता मनपाकडून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. नवी मुंबईत ऑक्सिजन निर्मितीसाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी महापालिकेने द्रवरुप ऑक्सिजनच्या टाक्या बसवून साठवण करून ठेवण्याचा मार्ग शोधला आहे.

नवी मुंबईत केवळ ऑक्सिजनसाठी 40 कोटी खर्च 

नवी मुंबईत दिवसाला 200 ऑक्सिजन सिलेंडरची मागणी आहे. सध्या ऑक्सिजनवर 1.5 ते 2 करोड रुपये खर्च केला जात आहे. गेल्या सहा महिन्यात नवी मुंबई महापालिकेला केवळ ऑक्सिजनसाठी 40 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

ऑक्सिजनच्या एका सिलेंडरमध्ये 175 क्यूबिक मीटरचा साठा असतो. त्यानुसार दिवसाला एका केंद्रावर 14 सिलेंडर लागतात. तर लिक्विड गॅस सिलेंडर मध्ये 25 गॅस सिलेंडर बसतात. त्यामुळे लिक्विड गॅस सिलेंडर फायद्याचे ठरत आहेत. दरम्यान नवी मुंबईत एका व्यक्तीला 7.2 लीटर प्रति मिनिट इतका ऑक्सिजन द्यावा लागत आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.  (Oxygen production by Mumbai and Navi Mumbai Municipal Corporation)

संबंधित बातम्या : 

Oxygen Man | मरणकळा सोसणाऱ्यांचा जीवनदाता, लोकांना देतो मोफत ऑक्सिजन सिलिंडर; वाचा ‘ऑक्सिजन मॅन’ची अनोखी कहाणी

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.