AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा

Pahalgam Terrorist Attack : 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला. दहशतवाद्यांनी निरपराध 26 पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात काही प्रत्यक्षदर्शींचे अनुभव, अंगावर काटा आणणारा आहे. नांदेडच्या दाम्पत्याने असाच काहीसा अनुभव सांगितला आहे.

Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर...पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
नांदेड दाम्पत्याचा तो थरारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 30, 2025 | 11:09 AM
Share

Krushana And Sakshi Lolge : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दांपत्ये आज नांदेडला परतले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात निष्पाप 26 पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. तर अनेक जण जखमी झाले. तर या हल्ल्यात अनेक पर्यटक थोडक्यात बचावले. नांदेड मधील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे त्यापैकी एक. त्यांनी जे अनुभव सांगितला तो अंगावर काटा आणणारा आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे सहली साठी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेले होते. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते खाली उतरत होते. काही अंतरावरच असलेल्या लोलगे दांपत्य यांनी या घटनेचा थरार सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. लोलगे दांपत्य नांदेडमध्ये आल्यानंतर कुटुंबियांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं.

गोळीबाराच्या आवाजाने काळजास धस्स

कृष्णा लोलगे यांनी या हल्ल्याचा थरार जवळून अनुभवला. पहलगाम येथे ते घटनेवेळी होते. आम्ही एक-दीड तास त्या ठिकाणी फिरलो आणि नंतर घोड्यावर बसून खाली येत होतो. तेव्हा गोळ्यांचा आम्हाला आवाज आला. रूमवर गेल्यानंतर कळाल हा आतंकवादी हल्ला होता त्यानंतर एकदम आम्ही घाबरलो. आर्मीचे जवान, चाँपर वगैरे जात होते. त्यामुळे आम्हाला संशय आला होता. जेव्हा आम्ही तिथे होतो तेव्हा साधारणपणे 3 हजार लोक असतील. आम्हाला आवाज आला होता म्हटलं झाले असेल काही तरी, आम्ही दुर्लक्ष केलं, मात्र जेव्हा कळलं की दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा आम्ही घाबरलो, असे कृष्णा लोलगे म्हणाले.

रुम बाहेर पडायला भीती वाटायची

साक्षी लोलगे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. तिथला अनुभव भयंकर होता एवढ्या जणांचा प्राण गेला ती चांगली गोष्ट नाही. जसे आज आम्ही आलो तर सगळ्यांच्याच घरचे लोक वाट बघत असतील. जेव्हा मी फिरत होतो तेव्हा काहीही संशयाला नाही आला, आम्ही एकदम रिलॅक्स होतो. तसं झाल्यानंतर काही एन्जॉयमेंट झाली नाही आम्ही सतत घाबरत होतो. बाहेर निघायचा विचार आला की भीती वाटत होती, असे साक्षी लोलगे म्हणाल्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.