AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण; ताई काळजी घ्या, धनंजय मुंडे यांचा मेसेज

भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ओमिक्रॉन (Omicron) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी 1 जानेवारीला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण;  ताई काळजी घ्या, धनंजय मुंडे यांचा मेसेज
पंकजा मुंडे, भाजप नेत्या.
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 7:37 AM

मुंबई : भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ओमिक्रॉन (Omicron) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी 1 जानेवारीला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. पंकजा मुंडे कोरोनाची लागण झाल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घेण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. पंकजा मुंडे या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग

पंकजा मुंडे यांना यापूर्वी देखील कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ( आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.

धनंजय मुंडे यांचं पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचं आवाहन

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दुसऱ्यांदा कोरोना झाल्यानंतर पोस्ट कोविडची काळजी फार महत्त्वाची असून नंतर खूप त्रास होतो. मी त्यांना फोन करु नाही शकलो मात्र काळजी घेतली पाहिजे असं मेसेजद्वारे पंकजाताईंना सांगितल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

रोहित पवार यांना देखील कोरोना

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. राज्यात 3 जानेवारीला ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

इतर बातम्या:

Varun Sardesai | युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण

नारायण राणेंसारख्या नेत्याला मी खपवतो, खासदारांनी माझ्या नादी लागू नये, गुलाबराव पाटलांचं उन्मेष पाटील यांना प्रत्युत्तर

Pankaja Munde infected by omicron variant of corona virus

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.