“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, पंकजा मुंडेंचे प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट

पंकजा मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिम्मित खास ट्विट केलं आहे. Pankaja Munde tweet on Pritam Munde birthday

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली, पंकजा मुंडेंचे प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट
पंकजा मुंडे प्रीतम मुंडे
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 2:56 PM

मुंबई: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिम्मित खास ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना आशीर्वाद देत नेहमी सुखी राहा असं म्हटलंय. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत आहेत. प्रीतम मुंडे राजकारणासोबत सामाजिक कामातही अग्रेसर असतात. (BJP leader Pankaja Munde wish sister Pritam Munde on her birthday with tweet)

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना वाढदिवासाच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला आहे. ” लहान माझी बाहुली तिची मोठी सावली…इतकी एकरुप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा…, या शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकजा मुंडेंचे ट्विट

प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा लोकसभेत

डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर निवडून आल्या होत्या.

लोकसभेत महाराष्ट्राच्या मुद्यांची प्रभावी मांडणी

महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये प्रीतम मुंडे या नेहमी राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडताना दिसतात. प्रीतम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत केले भाषण चांगलंच गाजलं होतं. प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या:

जेव्हा डॉ. प्रीतम मुंडे गाडी थांबवून जखमी व्यक्तीची मदत करतात….

भाजप टाकाऊपासून टिकाऊ झाला, कुणी विचारत नव्हतं तेव्हापासून आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं : प्रीतम मुंडे

(BJP leader Pankaja Munde wish sister Pritam Munde on her birthday with tweet)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.